What should not be eaten after eating chicken?
चिकन हा एक चवीष्ट असा खाद्यपदार्थ आहे. अनेकांना चिकन खायायला खूप आवडते. चिकनमध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असे प्रोटीन्स यासारखे पोषक घटक देखील असतात. असे जरी असले तरीही चिकन खाल्ल्यानंतर काही पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. कारण हे पदार्थ चिकनमध्ये असलेल्या पोषक तत्वांशी भिन्न असल्याने ते पदार्थ चिकन खाल्यानंतर खाल्यामुळे काही त्रास होऊ शकतो.
चिकन खाल्ल्यावर काय खाऊ नये..?
1) दुध व दही –
चिकन खाल्ल्यानंतर दुध व दही खाऊ नये. कारण दुधाच्या पदार्थात असलेले कॅसिन प्रोटीन्स चिकनमध्ये असलेल्या प्रोटीन्सशी जुळत नाही. त्यामुळे चिकन खाल्ल्यानंतर दूध किंवा दही खाल्ल्यास ते अपायकारक ठरू शकते. त्यामुळे पोटदुखी, गॅस, अपचन, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.
2) आंबट पदार्थ –
चिकन खाल्ल्यानंतर आंबट पदार्थ खाऊ नये. कारण यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.
3) फळे –
चिकन खाल्ल्यानंतर फळे खाऊ नये. कारण यामुळे चिकनमध्ये असलेल्या लोहाचे शोषण होत नाही.
4) सोडा –
चिकन खाल्ल्यानंतर सोडा पिणे टाळावे. कारण सोड्यामध्ये असलेल्या कार्बोनेटेड पाण्यातील फुगे चिकनमध्ये असलेल्या प्रोटीनवर विपरीत परिणाम करू शकतात. त्यामुळेही पोटदुखी, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.
5) अल्कोहोल –
चिकन खाल्ल्यानंतर अल्कोहोल पिणे टाळावे. अल्कोहोल आणि चिकन एकत्र खाल्ल्याने चिकनमधील पोषक तत्व शोषून घेण्यास अडथळा येऊ शकतो. तसेच यामुळेही पोटदुखी, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.
6) कॉफी –
चिकन खाल्ल्यानंतर कॉफी पिणे टाळावे. कारण कॉफीमध्ये आलेले कॅफिन हा घटक चिकनमधील लोह शोषून घेण्याची क्षमता कमी करते. त्यामुळे चिकन खाल्ल्यानंतर कॉफी पिल्याने लोहाची कमतरता होऊ शकते.
चिकन खाल्ल्यावर दूध, दही, आंबट पदार्थ, फळे, अल्कोहोल, सोडा आणि कॉफी असे पदार्थ खाऊ नयेत. कारण यामुळे शरीराला अपाय होण्याची शक्यता असते. असे पदार्थ टाळल्यास कोणताही अपाय न होता खाल्लेल्या चिकनमधील पोषक तत्वे चांगल्या प्रकारे आपल्या शरीराला मिळतील.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा दही खाण्यामुळे होणारे फायदे व नुकसान जाणून घ्या..
This health article is written by Dr. Satish Upalkar.