नाकात तुपाचे दोन थेंब टाकणे –
नाकात देशी गाईचे तूप घालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. देशी गाईचे तूप हे आयुर्वेदिक गुणांनी समृध्द असते. त्यामुळे देशी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात घातल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
नाकात गाईचे तूप टाकण्याचे फायदे –
नाकात तूप टाकण्यामुळे अर्धशिशी डोकेदुखीची समस्या दूर होते. यामुळे झोप व्यवस्थित लागते. झोपेच्या तक्रारी दूर होतात. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. नाकातील कोरडेपणा व गच्च झालेले नाक मोकळे होण्यास मदत होते. केसांचे आरोग्य सुधारते. असे अनेक फायदे नाकात तूप घातल्याने होतात.
1) मायग्रेन डोकेदुखीची समस्या दूर होते.
नाकात तूप घातल्याने मायग्रेन डोकेदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते. बऱ्याच जणांना वरचेवर अर्धे डोके दुखण्याचा त्रास होत असतो. अशावेळी रोज देशी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात घालावेत.
2) नाकातील कोरडेपणा दूर होतो.
तूप हे स्निग्ध गुणांचे असल्याने नाकात तूप टाकल्याने नाकातील कोरडेपणा दूर होतो.
3) स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते.
रोज देशी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात घालणे हे मेंदूच्या आरोग्यासाठी हितकारक असून यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते. विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचे ठरू शकते.
4) केसांच्या समस्या दूर होतात.
नाकात तूप सोडल्याने केस गळणे, केस पांढरे होणे यासारख्या केसांच्या समस्या देखील यामुळे कमी होतात.
5) झोपेच्या तक्रारी दूर होतात.
नाकात तूप घातल्याने झोपेच्या तक्रारी व झोपेत घोरण्याची समस्या देखील दूर होण्यास मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नाकात दोन थेंब तूप टाकावे.
6) चोंदलेले नाक मोकळे होते.
नाकात तूप टाकल्याने सर्दीमुळे चोंदलेले नाक मोकळे होण्यासाठी मदत होते.
नाकात अशाप्रकारे तूप घालावे ..
- कोमट केलेल्या तुपाचे एक ते दोन थेंब नाकात टाकावेत.
- केवळ देशी गाईच्या तुपाचा वापर करावा.
- रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा उपाशीपोटी नाकात तूप टाकावे.
हे सुध्दा वाचा – तूप खाण्याचे फायदे जाणून घ्या..
Read Marathi language article about Cow ghee nasal drops benefits. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.