केस गळणे (Hair fall) –
बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, ताणतणाव, प्रदूषण याचा परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्याबरोबरच केसांवरही होत असतो. त्यामुळे केस गळणे ही समस्या होत असते.
केस गळणे यावर घरगुती उपाय –
कांदा..
कांदा बारीक चिरून मिक्सरमधून वाटून त्याची पातळ पेस्ट करावी. ही पेस्ट पंधरा मिनिटे केसांना लावावी त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा. केस गळणे याच्यावर हा उपाय खूप उपयोगी पडतो.
लसूण..
लसणाच्या काही पाकळ्या ठेचून त्या खोबरेल तेलात घालून मिश्रण गरम करून घ्यावे. लसूण मिसळलेले तेल थोडे थंड झाल्यावर केसांच्या मुळांशी लावावे. अर्ध्या तासाने केस धुवावेत. लसणाचे सर्व फायदे वाचा..
मेथी बिया..
मेथीचे बी रात्रभर पाण्यात भिजत घालावे. त्यानंतर सकाळी ते भिजलेले बी बारीक वाटावे व त्याचा लेप एक केसांना लावून एक तासानंतर केस धुवावेत. हा उपयुक्त उपाय अनेक दिवस केल्यास केस गळणे ही समस्या दूर होते.
जास्वंद..
काही जास्वंदाची फुले बारीक कुटून खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा. त्यानंतर हे तेल काही तासांसाठी केसांना लावावे त्यानंतर केस धुवावेत. जास्वंद केसांना पोषण देतात, केस गळणे ही समस्या दूर होते.
आवळा..
आवळ्याच्या सीझनमध्ये आवळे आणून ते उकडावेत. त्यातील बिया काढून टाकाव्यात. त्यानंतर उरलेला आवळ्याचा गर खोबरेल तेलात घालून मिश्रण गरम करून घ्यावे. दररोज आपण हे आवळ्याचे गुणकारी तेल केसांना लावावे. यामुळेही केस गळणे ही समस्या दूर होते.
खोबरेल तेल आणि कापूर..
नारळाच्या तेलात कापूर मिसळून केसांना लावणे उपयोगी ठरते. केस गळणे समस्या असल्यास केस धुण्याआधी एक तास हे कापूर मिसळलेले तेल केसांना लावावे.
हे सुध्दा वाचा – ब्युटी टीप्स जाणून घ्या.
Read Marathi language article about hair fall Home remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.