Dr Satish Upalkar’s article about Lipoma upay in Marathi.
त्वचेवरील चरबीच्या गाठी कमी करणे –
बऱ्याच जणांच्या अंगावर चरबीच्या गाठी येतात. या त्रासाला लिपोमा (Lipoma) असे म्हणतात. ह्या गाठी स्पर्षास मऊ लागत असतात. तसेच त्या गाठी दुखत नाहीत. अनुवांशिकता, जेनेटिक फॅक्टर, हार्मोन्समधील बदल यांमुळे अशा गाठी येत असतात. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी अंगावरील चरबीच्या गाठी जाण्यासाठी कोणते उपाय करावे याची माहिती सांगितली आहे.
चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी घरगुती उपाय –
खोबरेल तेलात आयुर्वेदिक उटणे मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट रोज अंघोळीपूर्वी चरबीच्या गाठींना लावावी व हाताने मसाज करावा. यामुळे चरबीच्या गाठी कमी होण्यासाठी मदत होते. यासाठी एरंडेल तेल सुध्दा तुम्ही वापरू शकता. तसेच चरबीच्या गाठीवर हळदीचा लेप लावल्याने देखील चरबीच्या गाठी कमी होतात. हे घरगुती उपाय चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.
चरबीच्या गाठी जाण्यासाठी काय करावे..?
- खोबरेल तेलात किंवा एरंडेल तेलात आयुर्वेदिक उटणे मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट रोज अंघोळीपूर्वी चरबीच्या गाठींना लावावी व हाताने मसाज करावा. हा आयुर्वेदिक उपाय नियमित काही दिवस केल्यास चरबीच्या गाठी हळूहळू कमी होतात
- चरबीची गाठ निघून जाण्यासाठी त्या गाठींवर एरंडेल तेल लावून मसाज करावा.
- दररोज ग्लासभर कोमट पाण्यात लिंबूरस मिसळून ते पाणी प्यावे. यामुळेही चरबीची गाठ कमी होण्यास मदत होते.
- कापसाचा बोळा लिंबू पाण्यात भिजवून तो चरबीच्या गाठीवर फिरवावा.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असेल..?
चरबीच्या गाठी ह्या फारशा धोकादायक नसतात. तरीही जर त्वचेवरील गाठी ह्या एकाएकी मोठ्या झाल्यास किंवा त्यांच्या रंगामध्ये फरक पडल्यास किंवा गाठींच्या ठिकाणी वेदना अधिक होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन गाठींचे निदान करणे आवश्यक आहे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – चरबीच्या गाठी येण्याची कारणे व त्यावरील उपचार जाणून घ्या..
In this article information about Lipoma Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).
मी पुणे येथून असून माझ्या हातावर चरबीच्या गाठी आल्या आहेत. यावर काही उपचार आहेत का?
चरबीच्या गाठीवर Surgery आणि Liposuction यासारखे उपचार उपलब्ध आहेत. यासाठी जवळच्या त्वचारोग तज्ज्ञांशी संपर्क साधा.