चिकू – Chikoo or Sapodilla :

चिकू चवीला अतिशय गोड असतात. चिकूमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए, सी व डी अशी जीवनसत्त्वे असतात. चिकूमध्ये फायबर, पोटॅशियम, सोडियम, तांबे, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखे इतर आवश्यक पोषक घटक असतात.

चिक्कू खाण्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. चिकूमधील व्हिटॅमिन सी मुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसेच यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. कॅन्सर व हृदयविकाराचा धोका कमी होतो. पचनक्रिया सुधारते. यातील फायबरमुळे पोट साफ होते. यातील पोटॅशियम मुळे रक्तदाब आटोक्यात राहतो.

चिकू खाण्याचे आरोग्यदायी 7 फायदे –

1) डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
चिकूमध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे व्हिटॅमिन ए असते. त्यामुळे चिकू खाल्ल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

2) रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
चिकूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

3) त्वचेचे आरोग्य सुधारते.
चिकूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी हे त्वचेतील मुख्य प्रोटीन कोलेजनच्या निर्मितीसाठी महत्वाचे असते. चिकू खाण्यामुळे त्वचेचे आरोग्य देखील चांगले राहते.

4) कॅन्सर व हृदयविकाराचा धोका कमी होतो.
चिकूमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरातील पेशींचे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान रोखण्यास मदत होते. यामुळे कॅन्सर व हृदयविकाराचा धोका कमी होतो.

5) पचनक्रिया सुधारते.
चिकू आपली पचनक्रिया सुधारते. चिकूमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे चिकू खाल्ल्यास पोट साफ होऊन बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच चिकू खाल्ल्यास इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) चा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.

6) रक्तदाब आटोक्यात राहतो.
चिकूमध्ये असणाऱ्या पोटॅशियम, मॅग्नेशियम ह्या घटकांमुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी चिकू जरूर खावे.

7) हाडे बळकट होतात.
चिकूमध्ये असणाऱ्या कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह ह्या घटकांमुळे आपली हाडे बळकट होण्यास मदत होते.

मधुमेह रुग्णांनी चिकू खावे का?

चिकू फळात फ्रूक्टोज आणि सुक्रोज या नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असून यामध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यामुळे डायबेटिस असल्यास चिकू खाऊ नये. मधुमेह रुग्णांसाठी योग्य फळे जाणून घ्या..

चिकू खाण्याचे तोटे व नुकसान –

अधिक प्रमाणात चिकू खाण्यामुळे कफाचा त्रास होऊ शकतो. चिकू खाल्यास रक्तातील साखर वाढते. यामुळे वजन देखील वाढते. जास्त चिकू खाल्यास पोट बिघडू शकते. कच्चा चिकू खाल्यास घशात खवखव होऊ शकते. तसेच काही जणांना यामुळे ऍलर्जी देखील होऊ शकते.

चिकू मधील पोषक घटक –

170 ग्रॅम चिकू मधील पोषकतत्वे.

  • कॅलरीज: 141
  • कर्बोदकांमधे: 34 ग्रॅम
  • प्रथिने: 0.7 ग्रॅम
  • फॅट: 1.8 ग्रॅम
  • फायबर: 9 ग्रॅम
  • व्हिटॅमिन सी: 28% (DV)
  • फोलेट: DV 6%
  • पॅन्टोथेनिक ऍसिड (B5): DV 9%
  • लोह: DV 8%
  • पोटॅशियम: DV 7%
  • तांबे: DV 16%
  • मॅग्नेशियम: DV 5%

हे सुध्दा वाचा – केळी खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या..

Read Marathi language article about Chikoo or Sapodilla health benefits and side effects. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *