Black stool causes and treatments in Marathi.
संडास काळी होणे –
अनेक कारणांनी संडास काळी होते. विशिष्ट आहार, पचनसंस्थेतील इन्फेक्शन किंवा पोटातील रक्तस्त्राव अशी कारणे यासाठी जबाबदार असतात.
काळी संडास होण्याची कारणे –
- खात असलेल्या पदार्थांमुळे संडास काळी होऊ शकते. जसे ब्लूबेरी, डार्क चॉकलेट असे पदार्थ खाल्यास शौचाचा रंग काळा येऊ शकतो.
- लोह गोळ्या किंवा बिस्मथ घटक असलेली औषधे घेत असल्यास त्यामुळे संडास काळी होऊ शकते.
- बद्धकोष्ठतेमुळे रोजच्या रोज संडासला न झाल्यास संडास काळी होऊ शकते.
- पोटातील अल्सरमुळे संडास काळी होते. अल्सरमध्ये पोटात जळजळ होणे, जेवणानंतर पोट दुखणे असे त्रासही होतात. अल्सरमध्ये रक्तस्त्राव होत असल्यास संडास काळी होते.
- याशिवाय पोटाजवळील कॅन्सर, जठराची सूज, अन्ननलिका दाह, मॅलरी-वेइस सिंड्रोम अशा कारणांनी पोटात रक्तस्त्राव होऊन संडास काळी होऊ शकते.
पोटातील रक्तस्त्रावामुळे संडास काळी होत असल्यास ते काळजीचे कारण असते.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ?
काही दिवसांपासून संडास काळी होत असल्यास आणि त्याबरोबरच जर पोटदुखी, पोटात किंवा छातीत जळजळ होणे, मळमळ व उलट्या होणे, चक्कर येणे असे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
संडास काळी होणे याचे निदान –
संडास कशामुळे काळी होत आहे याचे निदान करण्यासाठी लॅबमध्ये ब्लड टेस्ट, शौचाची चाचणी केली जाते. याशिवाय पोटाच्या आतील स्थिती पाहण्यासाठी गॅस्ट्रोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी ह्या तपासण्या केल्या जातात.
संडास काळी होणे यावर उपचार –
कोणत्या कारणांमुळे संडास काळी होत आहे त्यानुसार उपचार ठरतात. लोह गोळ्या किंवा बिस्मथ सब्सॅलिसिलेट खाल्याने संडास काळी होत असल्यास त्यासाठी दुसरी औषधे डॉक्टर देतील. अल्सरमुळे संडास काळी होत असल्यास अल्सरवरील उपचार केले जातात.
संडास काळी होणे यावर उपाय –
आहारामुळे काळी संडास होत असल्यास आहारात बदल करून पहावा.
बद्धकोष्ठतेमुळे काळी संडास होत असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात अर्धा चमचा तूप घालून प्यावे. यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते.
बद्धकोष्ठतेमुळे काळी संडास होत असल्यास रात्रभर पाण्यात काही मनुका भिजत घालाव्यात. सकाळी उठल्यावर त्या भिजलेल्या मनुका खाव्यात. यामुळेही पोट साफ होण्यासाठी मदत होते.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – रक्ताची संडास होण्याची कारणे व उपचार जाणून घ्या..
In this article information about Black colour stool Causes, Symptoms, Treatment and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.
आपण दिलेली माहीती अतिशय उपयुक्त आहे .
धन्यवाद
Thanks for your feedback