डोळे सुजणे – Blepharitis :

काहीवेळा अनेक कारणांनी डोळ्यांच्या पापणीला सूज येत असते. अशावेळी डोळे सुजल्यासारखे वाटतात. त्यामुळे डोळ्यांच्या ठिकाणी सूज येऊन तेथे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लालसर होणे, डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यांना उजेड किंवा वारा सहन न होणे असे त्रासही यावेळी होऊ शकतात. येथे डोळा सुजणे याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती दिली आहे.

डोळे सुजणे याची कारणे :

 • ऍलर्जी,
 • बॅक्टेरियल इन्फेक्शन,
 • काही औषधांचा परिणाम,
 • डोळ्यांच्या ठिकाणी मार बसणे,
 • स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप यांचा अतिवापर,
 • अपुरी झोप,
 • कमी पाणी पिण्याची सवय,
 • दारूचे व्यसन,
 • आहारातील मिठाचे प्रमाण अधिक असणे,
 • रडणे,
 • डोळ्यात धूळ, कचरा, तेल गेल्यामुळे डोळ्यांच्या पापण्या सुजल्यासारख्या वाटतात.

डोळा सुजणे यावरील उपचार – Eyelid Inflammation treatment in Marathi :

डोळ्यांमध्ये सूज जाणवत असल्यास नेमके निदान करून उपचार ठरवले जातील. त्यानंतर आपले डॉक्टर आयड्रॉप, क्रीम किंवा औषधे देतील. तसेच बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे डोळे सुजले असल्यास अँटी-बायोटिक औषधे दिली जातील.

डोळे सुजणे यावरील घरगुती उपाय :

थंड पाणी –
डोळ्यांना सूज आल्यास थंड पाण्याने डोळे धुवावेत. तसेच आपण बर्फ देखील वापरू शकता. यासाठी स्वच्छ कापडामध्ये बर्फाचे काही तुकडे घेऊन त्याने डोळ्यांना शेकावे. हा घरगुती उपाय डोळे सुजणे यावर खूप उपयुक्त आहे. यामुळे डोळ्यांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

कोल्ड कॉम्प्रेस –
कोल्ड कॉम्प्रेसमुळे डोळ्यांची सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. यासाठी स्वच्छ कापड घेऊन ते थंड पाण्यात भिजवा आणि पिळून घ्या. हे थंड कापड आपल्या डोळ्यांवर काही मिनिटांसाठी ठेवावे व हलका दाब द्यावा.

काकडी व बटाट्याचे काप –
फ्रीजमधील थंड काकडी घेऊन त्याचे पातळ काप करावेत. हे काकडीचे काप काही वेळ डोळ्यावर ठेवावे. यामुळे डोळ्यांच्या ठिकाणी आलेली सूज दूर होते. त्याचप्रमाणे बटाट्याचे काप डोळ्यांवर ठेवणेही उपयोगी असते.

डोळ्यांना सूज येत असल्यास अशी घ्यावी काळजी :

 1. वेळेवर झोपावे. जागरण करणे टाळावे.
 2. दिवसभरात पुरेसे म्हणजे 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
 3. मद्यपान करणे टाळा.
 4. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. सैंधव मिठाचा समावेश आहारात करा.
 5. अधिक दिवसापासून जर डोळ्यांना सूज येत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)

हे सुद्धा वाचा..
डोळे येणे याची कारणे व उपाय याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Blepharitis or Eyelid Inflammation causes and treatment in Marathi.