डोळ्यात खाज सुटणे – Itchy Eyes :

डोळे हे अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे डोळ्यात धूळ, कचरा गेल्यामुळे, प्रखर ऊन, डोळ्यातील जंतुसंसर्ग किंवा अँलर्जी यांमुळे प्रामुख्याने डोळ्यात खाज होत असते.

डोळ्यात खाज होण्याची कारणे :

• डोळ्यात बाहेरील धूळ, कचरा, प्रदूषण गेल्यामुळे डोळ्यात खाज होऊ शकते.
• प्रखर उन्हात फिरल्यामुळे,
• डोळ्यांत ऍलर्जीक रिऍक्शन झाल्यामुळे,
• डोळ्यातील बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे (जंतुसंसर्ग झाल्यामुळे),
• तिखट पदार्थ डोळ्यात गेल्यामुळे,
• सौंदर्य प्रसाधने, केमिकल्सयुक्त साबण डोळ्यात गेल्यामुळे,
• अस्वच्छ कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यामुळे,
• चष्म्याचा नंबर बदलल्यामुळे,
• पुरेशी झोप न घेण्यामुळे,
• स्मार्टफोन, कॉम्प्युटर किंवा टीव्ही अधिक काळ पाहत राहिल्यामुळे डोळ्यांत खाज सुटत असते.

डोळ्यात खाज येत असल्यास हे करा घरगुती उपाय :

काकडी –
डोळ्यात खाज सुटत असल्यास फ्रीजमध्ये ठेवलेल्या काकडीचे काप करून ते डोळ्यावर ठेवावे. यामुळे डोळ्यांना आराम मिळून डोळ्यातील खाज कमी होते.

बटाटा –
ताजा बटाटा घेऊन त्याचे काप डोळ्यावर ठेवावेत. यामुळे डोळ्यात खाज होणे कमी होते.

गुलाब जल –
गुलाबजलात भिजवलेले कापसाचे बोळे डोळ्यावर काही वेळ ठेवावेत किंवा एक थेंब गुलाबजल डोळ्यात घतल्यानेही डोळ्यातील खाज दूर होण्यास मदत होते.

डोळ्यात खाज होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :

स्वच्छ थंड पाण्याने डोळे धुवावेत..
दिवसातून दोन ते वेळा स्वच्छ थंड पाण्याने आपला चेहरा आणि डोळे धुवावेत. यांमुळे डोळ्यातील धूळ, कचरा निघून जाते. त्यामुळे डोळ्यांत खाज होत नाही.

डोळ्यांना चोळू नका..
डोळ्यात खाज होत असल्यास डोळे खाजवणे टाळावे. कारण डोळे चोळल्याने हा त्रास जास्त वाढतो. तसेच डोळ्यात इन्फेक्शन असल्यास ते इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता असते त्यामुळे असा त्रास होत असल्यास स्वच्छ रुमालने डोळे पुसावे किंवा स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत.

दर्जेदार गॉगल वापरावे..
उन्हाळ्यात सूर्यापासून निघणाऱ्या घातक UV किरणांमुळे डोळ्यांची खाज होत असते. यासाठी उन्हाळ्यात बाहेर फिरताना डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी दर्जेदार सनग्लासेज वापरावे. डोळ्यात धूळ, कचरा जाऊ नये यासाठीही हे गॉगल उपयुक्त ठरते.

स्मार्टफोन, टीव्ही चा मर्यादित वापर करा..
स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टिव्ही यांचा मर्यादित वापर करावा. या उपकरणांचा सलग वापर करणे टाळावे. डोळ्यांना 15 – 20 मिनिटांनी विश्रांती द्यावी.

डोळे लाल होणे यावरील उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)