डोळ्यातून सारखे पाणी येत असल्यास हे करा घरगुती उपाय – Watering eyes treatment in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

डोळ्यातून सतत पाणी येणे – Watery Eyes :

डोळे हे आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक अवयव असून डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. डोळ्यात कचरा, धूळ जाणे, एखादी बाहेरील वस्तू (फॉरन बॉडी) डोळ्यात जाणे, स्मार्टफोन-कॉम्प्युटर-टीव्ही यांचा अतिवापर, डोळ्यातील जंतुसंसर्ग आणि अँलर्जी यांमुळे प्रामुख्याने डोळ्यातून सतत पाणी येण्याची समस्या होऊ शकते.

डोळ्यातून सारखे पाणी येणे यावर हे करा घरगुती उपाय :

डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत –
डोळ्यातून सतत पाणी येत असल्यास थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवावेत. तसेच डोळ्यात सारखे पाणी येत असल्यास हाताने डोळे पुसू किंवा चोळू नयेत. यासाठी स्वच्छ रुमाल वापरावा. तसेच डोळ्यांना स्पर्श केल्यास तत्काळ हात धुऊन घ्यावे. कारण त्यामुळे इन्फेक्शन इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता असते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

काकडी –
डोळ्यातून सतत पाणी येत असल्यास फ्रीजमध्ये ठेवलेल्या काकडीचे काप करून ते डोळ्यावर काही वेळ ठेवावे. काकडी थंड गुणांची असल्याने यामुळे डोळ्यांना आराम मिळून डोळ्यातून पाणी येण्याची समस्या थांबते. अशाच प्रकारे गाजराचे कापही डोळ्यावर ठेऊ शकता.

गुलाबजल –
गुलाबजलात भिजवलेले कापसाचे बोळे डोळ्यावर काही वेळ ठेवावेत किंवा दोन थेंब गुलाबजल डोळ्यात घतल्यानेही डोळ्यात सारखे पाणी येण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

डोळे येण्याची कारणे, लक्षणे व त्यावरील उपाय जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.