डोळे दुखणे यावर घरगुती उपाय मराठी माहिती

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Eye pain Causes & treatment in Marathi, dole dukhane in marathi, dole dukhi var upay.

डोळे दुखण्याची कारणे :

डोळे हे खूपच नाजूक अवयव असतात. अनेक कारणामुळे डोळे दुखू शकतात. अपुरी झोप, स्मार्टफोन-कॉम्प्युटर किंवा टीव्हीचा अतिवापर, तणाव, हवेतील प्रदूषण, डोळ्यातील इन्फेक्शन, डोळ्यात कचरा किंवा एखादी वस्तू गेल्यामुळे आणि एलर्जी यांमुळे हा त्रास होत असतो.

डोळे दुखणे उपाय :

काकडी –
डोळे दुखत असल्यास फ्रीजमध्ये ठेवलेल्या काकडीचे काप करून ते डोळ्यावर ठेवावे. यामुळे डोळ्यांना आराम मिळून डोळे दुखणे थांबते.

बटाटा –
बटाट्याचे काप ही डोळे दुखत असल्यास उपयोगी ठरतात. यासाठी ताजा बटाटा घेऊन त्याचे काप डोळ्यावर ठेवावेत. यामुळे डोळे दुखणे कमी होते.

गुलाबजल –
गुलाबजलाने डोळे धुतल्याने किंवा एक थेंब गुलाबजल डोळ्यात घतल्यानेही डोळ्यातील वेदना दूर होण्यास मदत होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

डोळे दुखू नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी..?

• पुरेशी झोप घ्यावी.
• रात्री जागरण करणे टाळावे.
• दिवसातून दोन ते तीन वेळा डोळे थंड पाण्याने धुवावेत.
• स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टिव्ही यांचा मर्यादित वापर करावा.
• या उपकरणांचा सलग वापर करणे टाळावे. डोळ्यांना 15 – 20 मिनिटांनी विश्रांती द्यावी.
• उन्हात बाहेर फिरताना चांगल्या दर्जाचे गॉगल्स वापरावे.
• कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असल्यास ते नेहमी स्वच्छ करूनच वापरावे.
• रात्री झोपताना डोक्याला खोबरेल तेल लावून हलकी मालिश करावी.
• झोपण्यापूर्वी तळपायाला थोडे खोबरेल तेल लावून कांस्याच्या वाटीने घासावे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन झोप चांगली लागते व डोळ्यांचे आरोग्यही सुधारते.

डोळे दुखत असल्यास डॉक्टरांकडे केंव्हा जाणे गरजेचे असते..?

डोळे दुखणे हा सामान्य त्रास असला तरी काहीवेळा ते डोळ्यासंबंधी गंभीर आजाराचेही लक्षण असू शकते. डोळ्यात प्रचंड वेदना होत असल्यास किंवा अंधुक, अस्पष्ट दिसत असल्यास किंवा आपणास मधुमेह असल्यास घरगुती उपाय न करत बसता तात्काळ आपल्या ENT स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जावे.

Eye pain: Causes, Symptoms and treatment in Marathi, Common causes of eye pain in Marathi information.