डोळ्यातून घाण येणे – Eye Discharge in Marathi :

आपल्या डोळ्यातून एक पांढरा, चिकटसर पदार्थ येत असतो. याला सामान्य भाषेत डोळ्यातून घाण येणे असेही म्हणतात. विशेषतः झोपेतून उठल्यावर सकाळी डोळ्यांच्या ठिकाणी अशी घाण जमा झाल्याचे दिसून येते. डोळ्यातून असा स्त्राव येणे ही एक सामान्य बाब असू शकते. तसेच सतत डोळ्यातून घाण येत असल्यास ते काहीवेळा काळजीचे कारणही असू शकते.

डोळ्यातून घाण येण्याची कारणे :

  • झोपून उठल्यामुळे,
  • डोळ्यात इन्फेक्शन झाल्याने डोळे आल्यामुळे (Conjunctivitis),
  • ऍलर्जीमुळे,
  • डोळे कोरडे पडण्याच्या समस्येमुळे कॉर्नियामध्ये अल्सर झाल्याने डोळ्यातून घाण येत असते.

डोळ्यातून घाण येत असल्यास डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते..?

झोपून उठल्यावर डोळ्यातून घाण येणे, पांढरट स्त्राव येणे ही सामान्य बाब आहे. मात्र जर एका किंवा दोन्ही डोळ्यातून सतत व अधिक प्रमाणात स्त्राव येणे, पिवळा किंवा हिरव्या रंगाचा स्त्राव येणे, डोळ्यात खाज सुटणे, जळजळ होणे, डोळे लाल होणे, डोळ्यांच्या ठिकाणी वेदना होणे अशी लक्षणे जाणवत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते.

डोळ्यातून घाण येणे यावर उपचार – Eye Discharge Treatment in Marathi :

डोळ्यात इन्फेक्शन झाल्याने डोळ्यातून घाण येत असल्यास आपले डॉक्टर Antibiotics औषधे व ड्रॉप्स देतील. ऍलर्जीमुळे घाण पाणी येत असल्यास Antihistamine औषधे देतील.

डोळ्यातून घाण येणे यावरील घरगुती उपाय :

डोळ्यातून घाण येत असल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा आपले डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. डोळ्यात इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपल्या हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे. सकाळी उठल्यावर डोळ्यात घाण जमा होऊन डोळे चिकटले असल्यास पाण्याने डोळे धुवावेत. डोळ्यातून घाण येणे यावर वरील उपाय उपयुक्त ठरतात.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुद्धा वाचा..
डोळ्यातून सारखे पाणी येणे यावरील उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...