बेंबी जवळ दुखणे –
बऱ्याचदा बेंबी जवळ दुखू लागते. आपल्या बेंबी जवळ आतडे मुत्रवह संस्थेचे अवयव, प्रजनन अवयव असे अवयव येतात. त्यामुळे विविध कारणांमुळे बेंबी जवळ दुखू शकते. मूत्रमार्गातील इन्फेक्शन, मूतखडा, ॲपेंडिक्सला सूज येणे, हर्निया, गॅसेस, मासिक पाळी, गर्भावस्था अशा विविध कारणांनी बेंबी मध्ये दुखते.
बेंबी मध्ये दुखणे याची कारणे –
- मूत्रमार्गात इन्फेक्शन होणे, मूतखडा, ॲपेंडिक्सला सूज येणे, हर्निया यामुळे बेंबी मध्ये दुखू शकते.
- पचन संबधित गॅसेस, बद्धकोष्ठता, अपचन, इरिटेबल बोवेल सिंड्रोम ह्यामुळे देखील बेंबी जवळ दुखते.
- बेंबी सरकल्यामुळे देखील तेथे दुखू लागते.
- हार्नियामुळे बेंबी जवळ दुखू शकते.
- स्त्रियांमध्ये मासिक पाळी, अंडाशयातील वेदना,
- गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस, गर्भावस्था अशा अनेक कारणांनी बेंबीमध्ये दुखत असते.
बेंबी जवळ दुखणे यावर घरगुती उपाय –
- बेंबीत दुखत असल्यास गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून ते पाणी प्यावे.
- बेंबी दुखत असल्यास तेथे गरम पाण्याच्या पिशवीने शेक घ्यावा.
- बेंबीत दुखत असल्यास अर्धा कप पाण्यात लिंबू रस व काळे मीठ घालून ते मिश्रण प्यावे. हे उपाय बेंबी जवळ दुखत असल्यास उपयोगी पडतात.
बेंबी सरकल्यामुळे बेंबी दुखत असल्यास उपाय –
- बेंबी सरकली असल्यास उपाशीपोटी मोहरीच्या तेलाचे काही थेंब बेंबीत घालावे. हा उपाय 3 ते 4 दिवस करावा.
- बेंबी सरकली असल्यास बेंबीच्या ठिकाणी एरंडेल तेल लावावे. व बेंबीच्या भोवताली हळुवार मालिश करावी.
- उपाशीपोटी 10 ग्रॅम बडीशेप व 20 ग्रॅम गूळ एकत्र बारीक करून खावे. बेंबी सरकणे यावर हे उपाय उपयोगी पडतात.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ?
बेबीमध्ये अतिशय वेदना होण्याबरोबरच जर छातीत दुखणे, ताप येणे, शौचावाटे रक्त जाणे, लघवीतून रक्त पडणे, लघवीला त्रास होणे, लघवीला जळजळ होणे, उलट्या होणे, उलटीतून रक्त पडणे, त्वचा पिवळसर होणे, पोटावर सूज येणे अशी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
हे सुध्दा वाचा – बेंबीत एरंडेल तेल टाकण्याचे फायदे जाणून घ्या..
Read Marathi language article about umbilical pain Causes, Symptoms, Treatment and Home remedies. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.