संधिवात (Arthritis) :
संधिवात किंवा सांधेदुखीचा त्रास अनेकांना असतो. सांध्यांना सूज येणे, सांधे दुखू लागणे व सांध्यांची हालचाल केल्यास वेदना जास्त होणे अशी लक्षणे संधिवातात असतात. या त्रासाला Arthritis (अर्थराइटिस) असेही म्हणतात.
संधिवात आणि आहार पथ्य :
संधिवातात योग्य आहार घेणे गरजेचे असते यासाठी संधिवात रुग्णांनी कोणता आहार घ्यावा यांची आयुर्वेदिक दृष्टीकोनातून माहिती खाली दिली आहे.
संधिवात असल्यास काय खावे..?
- संधिवातात सहज पचणारा पौष्टिक आहार घ्यावा.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, शेवगा, लसूण, आले, ओवा, तूप, दूध, मनुका, बदाम, विविध फळे यांचा समावेश असावा.
- सांधेदुखीमध्ये लसूण गुणकारी ठरते यामुळे संध्यातील सूज कमी होते तसेच लसणीमुळे रक्तातील यूरिक एसिडचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते. रक्तामध्ये युरिक ऍसिड जास्त प्रमाणात वाढल्याने होणाऱ्या वातरक्त किंवा Gout अर्थराइटिसमध्ये लसूण खूप उपयोगी ठरते.
- संधिवातात आले खाणेही गुणकारी आहे. आल्यामुळे शरीरातील, सांध्यांतील रक्त प्रवाह (Blood circulation) सुधारतो. सांधेदुखी असणाऱ्यानी आल्याचा तुकडा दिवसातून दोन वेळा चावून खावा.
- संधिवात रुग्णांनी नेहमी कोमट पाणी प्यावे.
संधिवात रुग्णांनी काय खाऊ नये..?
- सांधेदुखी असल्यास पचनास जड असणारे पदार्थ खाऊ नयेत.
- बटाटा, वाटाणा, हरभरा खाणे टाळावे.
- तेलकट पदार्थ, फास्टफूड, स्नॅक्स, थंडगार पदार्थ, मैद्याचे पदार्थ, जास्त गोड पदार्थ, मिठाई खाणे टाळावे कारण यामुळे वजन वाढते त्यामुळे अतिरिक्त वजनाचा भार आपल्या गुडघा व पायाच्या सांध्यांवर येतो.
- खारट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत कारण खारट पदार्थांमुळे संध्यातील सूज अधिक वाढते.
- सिगारेट, दारू, तंबाखू यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे. कारण स्मोकिंग व तंबाखूमुळे आमवात होण्याचा धोका वाढतो तर दारूमुळे रक्तातील युरिक ऍसिड वाढून गाऊटचा त्रास होण्याचा धोका वाढतो.
- गाऊटमुळे सांधेदुखी असल्यास सी-फूड म्हणजे मासे, झिंगा, कोळंबी, खेकडे खाणे टाळावे. कारण यामुळे रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढत असते.
Read Marathi language article about Arthritis Diet plan. Last Medically Reviewed on March 10, 2024 By Dr. Satish Upalkar.