कॅन्सरची सुरवातीची काही लक्षणे –
कॅन्सरमध्ये जाणवणारी सुरवातीची काही लक्षणे खाली सांगितली आहे. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीच कँसरचे निदान करुन घ्यावे. जेणेकरुन सुरवातीच्या अवस्थेमध्येच कैन्सरचे निदान होईल आणि कैन्सर असल्यास योग्य उपचाराने बरा होईल.
खोकताना रक्त येणे –
खोकताना रक्त येत असल्यास, थुंकीतून रक्त येत असल्यास फुप्फुस कैन्सरची अशंका असते. अशावेळी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. कैन्सरचे निदान करुन घ्यावे यांमध्ये फुप्फुस बायोप्सी, फुप्फुसाचा एक्सरे, स्कैनद्वारे निदान केले जाते.
मलाद्वारे रक्त येणे –
मलाद्वारे रक्त येत असल्यास पोटाचा कर्करोग, स्वादुपिंड कैन्सर, आतड्यांचा कर्करोग आणि मलाशयाच्या कर्करोगाची अशंका येते. तेंव्हा मलातून रक्त येत असल्यास वरील प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे गरजेचे असते.
लघवीतून रक्त येणे –
लघवीतून रक्त येत असल्यास किडनी कैन्सर, मुत्राशय कैन्सर आणि प्रोस्टेट कैन्सरची अशंका निर्माण होते. तेंव्हा लघवीतून रक्त येत असल्यास वरील प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे गरजेचे असते.
स्तनामध्ये गाठ असणे –
स्तनामध्ये गाठ जाणवत असल्यास ब्रेस्ट कैन्सर (स्तनाचा कर्करोगाचे) निदान करुन घेणे अत्यंत अवश्यक असते.
रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होणे –
स्त्रीयांमध्ये रजोनिवृत्तीनंतर जर रक्तस्त्राव येत असल्यास गर्भाशय कैन्सरचे निदान करुन घेणे गरजेचे असते.
अन्न गिळताना त्रास होणे –
अन्न गिळताना त्रास होत असल्यास तोंडाचा कैन्सर, अन्ननलिकेचा कैन्सरची अशंका येते. तेंव्हा असे लक्षण जाणवल्यास कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे गरजेचे असते.
शरीरातील असामान्य परिवर्तन –
शरीरावर गाठ जाणवणे, वरचेवर चक्कर येणे, मळमळणे, भुक एकाएकी मंदावणे, अन्न गिळण्यास त्रास जाणवणे, अधिक दिवस अतिसार होत असल्यास, वजन एकाएकी कमी होणे, मल-मुत्र विसर्जन व्यवस्थित न होणे यासारखे बदल जाणवल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
व्यसन असल्यास वेळोवेळी कैन्सरचे निदान करुन घ्या –
धुम्रपान, तंम्बाखु, गुटका, पानसुपारी इ. व्यसन असल्यास फुप्फुस कैन्सर, तोंडाचा कैन्सर, अन्ननलिकेचा कैन्सर, पोटाचा कैन्सर होण्याचा धोका अधिक असतो. मद्यपानाचे व्यसन असल्यास यकृत कैन्सर, पोटाचा कैन्सर होण्याचा धोका अधिक असतो. यासाठी व्यसनाधीन व्यक्तींनी वरील प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री करुन घ्यावी. कैन्सर पासून दूर राहण्यासाठी व्यसनांपासून दूर रहावे. लक्षात ठेवा सुरवातीच्या स्टेजमधीलच कॅन्सर उपचारांद्वारे बरा होतो. दुसऱ्या स्टेजमधील कॅन्सर किंवा शरीरात इतरत्र पसरलेला कर्करोग चिकित्सेच्या दृष्टिने असाध्य असतो. यासाठी कॅन्सरला वेळीच ओळखून अटकाव करणे गरजेचे असते.
प्रकारानुसार कॅन्सर ची लक्षणे –
तोंडात लाल व पांढरे चट्टे असणे, तोंडात जिभेवर गाठ किंवा जखम असणे.
घशाचा कॅन्सर –
आवाजात बदल होणे, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे.
खोकल्यातून रक्त येणे, वजन कमी होणे, थुंकीतून रक्त पडणे.
स्तनात गाठ असणे, काखेत गाठ असणे, निप्पलमधून पू, पाणी किंवा रक्त येणे.
गर्भाशयाचा कॅन्सर –
अंगावर लाल किंवा पांढरे जाणे, पाळीच्या वेळी जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे, संबंधानंतर रक्तस्त्राव होणे, पाळी बंद झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा स्त्राव होणे.
आतड्याचा कॅन्सर –
संडासवाटे रक्त जाणे, भुक कमी होणे, गुद्दव्दाराच्याजागी गाठ असणे, अचानक वजन कमी होणे.
किडनी व मुत्राशयाचा कॅन्सर –
लघवीवाटे रक्त जाणे. वरील कोणताही त्रास होत असल्यास व औषध उपचार घेऊन ही 1 ते 3 महिने त्रास बरा होत नसेल तर कॅन्सर तज्ज्ञांना भेटणे आवश्यक आहे.
Read Marathi language article about early symptoms of cancer. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 8, 2024.