पोट जड वाटणे –
बऱ्याचदा पोट जड होऊन अस्वस्थ वाटू लागते. प्रामुख्याने भरपेट जेवल्यामुळे हा त्रास होत असतो. याशिवाय पचनास जड असणारे पदार्थ अधिक खाल्याने, पोटातील गॅसेसमुळे, नियमित पोट साफ होत नसल्यामुळे हा त्रास होऊ शकतो.
पोट जड झाल्यास जाणवणारी लक्षणे –
पोट जड झाल्यास पोट अधिक भरल्यासारखे वाटते. त्यामुळे पोट जड होऊन अस्वस्थ वाटते, पोटात गॅस होतो, ढेकर येतात. तसेच यामुळे छातीत किंवा पोटात जळजळ होऊ शकते. काहीवेळा पोटात दुखुही लागते. असे त्रास पोट जड झाल्यास होतात.
पोट जड होण्याची कारणे –
- प्रामुख्याने भरपेट जेवणे, घाई गडबडीने जेवण खाणे यामुळे पोट जड होत असते.
- याशिवाय पचनास जड असणारे पदार्थ अधिक खाणे,
- तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ अधिक खाल्याने पोट जड होते.
- पोटातील गॅस, बद्धकोष्ठता यामुळे पोट जड वाटू लागते.
- अपचन, फूड एलर्जी, एसिडीटी, GERD, अल्सर, हर्निया, जठराला सूज येणे (Gastritis), स्वादुपिंडाला सूज येणे, पित्ताशयातील खडे यासारख्या त्रासामुळेही पोटाच्या ठिकाणी जडपणा जाणवू शकतो.
- तसेच पोटाभोवती जास्त फिट बेल्ट किंवा कपडे असल्यास त्यामुळेही पोट जड वाटू लागते.
पोट जड वाटणे यावरील उपाय –
पोट जड वाटत असल्यास एक चमचा ओवा ग्लासभर गरम पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे.
पोट जड वाटत असल्यास एक चमचा जिरेपूड गरम पाण्यात मिसळून प्यावे.
पोट जड झाल्यास आल्याचा तुकडा लिंबू रसाबरोबर खावा.
पोट जड वाटत असल्यास अर्धा चमचा हिंग गरम पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे. पोट जड होणे यावर हे उपाय उपयोगी पडतात.
पोट जड होऊ नये यासाठी काय करावे..?
- एकाचवेळी भरपेट खाणे टाळावे.
- घाई गडबडीने जेवण खाणे टाळावे. अन्न चावून सावकाश खावे.
- वारंवार तेलकट, तिखट मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
- पचनास जड असणारे पदार्थ खाणे कमी करा.
- वारंवार चहा, कॉफी पिणे टाळा.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करा.
- जेवणानंतर लगेच झोपणे टाळा.
- पोट साफ होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात घालून प्यावे.
अशी काळजी घेतल्यास पोट जड होण्याच्या त्रासापासून दूर राहता येते.
हे सुध्दा वाचा – पोटात गॅस होण्याची कारणे व उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Heaviness in Stomach Causes, Symptoms, Treatment and Home remedies. Last Medically Reviewed on February 27, 2024 By Dr. Satish Upalkar.