Hard poop causes and home remedies in Marathi.
संडासला खडा होणे –
बऱ्याचजणांना संडासला खडा होण्याची समस्या असते. संडासला खडा झाल्याने शौचावेळी गुदभागी अतिशय त्रास होत असतो. चुकीचा आहार, कमी पाणी पिण्याची सवय, बैठी जीवनशैली अशी कारणे यासाठी जबाबदार असतात.
संडासला खडा होण्याची कारणे –
- पचनास जड असणारे पदार्थ, फास्टफूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, मांसाहार अधिक खाण्यामुळे संडासला खडा धरत असतो.
- कमी पाणी पिण्याची सवय असल्यास त्यामुळेही संडासला खडा होत असते.
- बैठे काम व व्यायाम न करणे, पालेभाज्या कमी खाणे अशी कारणे सुध्दा यासाठी जबाबदार असतात.
संडासला खडा होणे यावर उपाय –
संडासला खडा धरत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण घालून ते मिश्रण प्यावे. यामुळे सकाळी संडास साफ होण्यास मदत होते.
संडासला खडा धरत असल्यास रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा एरंडेल तेल खाल्ल्यास खडा न धरता संडास साफ होते.
संडासला खडा होत असल्यास रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबूरस मिसळून त्यात चमचाभर एरंडेल तेल घालून प्यावे. हे उपाय संडासला खडा होत असल्यास उपयोगी पडतात.
संडासला खडा होऊ नये यासाठी घ्यायची काळजी –
- पचायला जड असणारे पदार्थ खाणे कमी करावे.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करावा.
- दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
- बैठी कामे असलेल्या लोकांनी रोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम करावा.
अशी काळजी घेतल्यास खडा न धरता संडासला रोजच्या रोज साफ होण्यासाठी मदत होते.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – संडासला फेस येणे याची कारणे व उपाय जाणून घ्या..
In this article information about Hard poop Causes, Symptoms, Treatment and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.