Foamy poop causes and treatments in Marathi.

sandas la fes yene upay in Marathi article by Dr Satish Upalkar

संडास मधून फेस येणे –
अनेक कारणांमुळे फेसाळ व तेलकट संडासला होऊ शकते. याची बरीच कारणे ही आहार संबंधित असतात. तसेच काहीवेळा इन्फेक्शन झाल्यमुळे देखील संडासला फेस येऊ शकतो.

संडासला फेस येण्याची कारणे –

  • दूषित पाणी, दूषित अन्न यातून इन्फेक्शन झाल्यमुळे पोट बिघडल्याने संडासला फेस येऊ शकतो.
  • क्रोहन रोग, इरिटेबल बोवेल सिंड्रोम, अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा सेलिआक रोग यामुळे फेसाळ संडास होऊ शकते.
  • तेलकट व चरबीचे पदार्थ अधिक खाण्यामुळे तेलकट फेसाळ संडास होऊ शकते.
  • दुधाचे पदार्थ पचत नसल्यास lactose intolerance मुळे संडासला फेस येऊ शकतो.
  • स्वादुपिंडाला सूज आल्यास तेलकट व फेसाळ संडासला होत असते.

डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे..?
संडासवाटे फेस येण्याबरोबर रक्त पडत असेल तर डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. तसेच पोटात कळ येऊन वारंवार शौचाला होणे, ताप येणे, पोटात दुखणे, उलट्या व मळमळ होणे असे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

संडास मधून फेस येणे यावरील उपाय –
संडास मधून फेस येत असल्यास पुरेसे पाणी प्यावे. पुरेसे पाणी पिणे हा यावरील सर्वात चांगला उपाय आहे. यावेळी उकळवून गार केलेले किंवा फिल्टरचे पाणी प्यावे.

संडासला फेस येत असल्यास ताकात थोडे हिंग, सुंठ, मिरी, जिरे, सैंधव मीठ घालून प्यावे.

संडासला फेस येत असल्यास गरम पाण्यात अर्धा चमचा सुंठ मिसळून प्यावे.

फेसाळ संडास होत असल्यास दहीभात खावा. तसेच मेथी दाण्याचे चूर्ण दह्यात मिसळुन खावे. हे उपाय संडास मधून फेस येणे यावर उपयोगी पडतात.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – चिकट संडास होणे यावरील उपाय जाणून घ्या..

In this article information about Foamy stool Causes, Symptoms, Treatment and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *