Stomach Cramps Causes and Treatments in Marathi.

potat gola yene upay in Marathi article by Dr Satish Upalkar.

पोटात गोळा येणे –
पोटात अचानक गोळा येऊन पोटाच्या स्नायूंमध्ये कडकपणा जाणवतो. त्यामुळे पोटात अतिशय वेदना होऊ लागतात. याशिवाय पातळ शौचास होणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास यामुळे होऊ शकतात.

पोटात गोळा येण्याची कारणे –

  • अन्नातून विषबाधा झाल्याने पोटात गोळा येऊ शकतो.
  • दूषित पाणी, दूषित अन्न यातून इन्फेक्शन झाल्याने गॅस्ट्रोएन्टेरिटिस, कोलायटिस सारख्या त्रासामुळे पोटात गोळा येऊ शकतो.
  • पोटाला सूज आल्याने गॅस्ट्र्रिटिस मुळे पोटात गोळा येऊ शकतो.
  • फूड ऍलर्जीमुळेही पोटात गोळा येऊ शकतो.
  • दुधाचे पदार्थ किंवा ग्लूटेनयुक्त पदार्थ न पचल्याने पोटात गोळा येऊ शकतो.
  • बद्धकोष्ठता (Constipation) मुळे,
    इरिटेबल बोवेल सिंड्रोम IBS आणि IBD अशा त्रासामुळे पोटात गोळा येऊ शकतो.
  • डिहायड्रेशनमुळे शरीरात पाणी कमी झाल्याने इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होऊन पोटात गोळा येऊ शकतो.
  • गरोदरपणात ब्रॅक्सटन-हिक्समुळे पोटात गोळा येऊ शकतो.

पोटात गोळा येणे याचे निदान कसे केले जाते ..?-
रुग्णाची शारीरिक तपासणी, लक्षणे, आहार हिस्ट्री यांच्या आधारे डॉक्टर पोटात गोळा येणे याचे निदान करू शकतात. तसेच अल्ट्रासाऊंड, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, एक्स-रे, MRI स्कॅन अशा तपासण्या कराव्या लागू शकतात. याशिवाय रक्त, लघवीची चाचणी सुद्धा करावी लागू शकते.

पोटात गोळा येणे यावरील उपचार –
पोटात नेमका कशामुळे गोळा येत आहे त्या कारणांनुसार यावरील उपचार ठरतात. जसे बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याने पोटात गोळा येत असल्यास त्यावेळी डॉक्टर, antibiotics औषधे देतील. तसेच पोटातील वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे दिली जातील.

पोटात गोळा येणे यावर घरगुती उपाय –
पोटात गोळा आल्यास पोटावर गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा.

पोटात गोळा आल्यास कोमट पाण्यात सैंधव मीठ घालून ते पाणी पोटावर शिंपडावे.

पोटाच्या स्नायूंना खोबरेल तेलाने हळुवार मसाज करावा. यामुळे तेथील रक्तप्रवाह सुधारतो आणि गोळे कमी होतात.

पोटात गोळा येत असल्यास पुरेसे पाणी प्यावे. तसेच नारळपाणी, फळांचा ताजा रस असे तरल पदार्थ प्यावेत.

कोणती लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे ..?
थांबून थांबून पोटात गोळा येणे, पोटात अतिशय दुखणे, शौचातून रक्त येणे, भरपूर उलट्या होणे, उलटीतून रक्त पडणे, ताप येणे, झटके येणे, पोटावर सूज येणे, श्वास घेताना त्रास होणे, डोळे व त्वचा पिवळसर रंगाची होणे असे त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

हे सुध्दा वाचा –
पोटात गॅस होणे यावरील उपाय यावरील उपाय जाणून घ्या..

[adinserter block=”5″]

In this article information about Stomach Cramps Causes, Symptoms, Treatment and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *