पोटातील गॅस – Stomach Gas problem :

अनेकांना पोटात गॅस होण्याची समस्या असते. पोटात गॅस होण्यासाठी चुकीचा आहार, बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव ही कारणे जबाबदार असतात.

पोटात गॅस होण्याची कारणे –

पोटात गॅस होण्यासाठी पचन संबंधित कारणे याला कारणीभूत असतात. काहीतरी खाल्ल्यानंतर किंवा पिल्यानंतर गॅसची समस्या होऊ शकते.

  • पचनास जड पदार्थ खाण्यामुळे, जसे तेलकट पदार्थ, मांसाहार, मैद्याचे पदार्थ, हरभरा, मटार, बटाटा, कोबी इत्यादी पदार्थ खाण्यामुळे पोटात गॅस होत असतो.
  • भरपेट जेवल्यामुळे पोटात गॅस होऊ शकतो.
  • बद्धकोष्ठता (पोट साफ न होण्यामुळे), पोटातील जंत, IBS यामुळेही पोटात गॅस होऊ शकतो.
  • गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसऑर्डर (GERD) मुळेही पोटात गॅस होऊ शकतो.
  • काही व्यक्तींना दुधाचे पदार्थ (लॅक्टोज) किंवा ग्लूटेनयुक्त पदार्थ पचत नाहीत. असे पदार्थ खाण्यामुळे पोटात गॅस होऊ शकतो.
  • तसेच व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, स्ट्रेस आणि तणाव अशा कारणांमुळेही पोटात गॅस होत असतो.

पोटात गॅस होण्याची लक्षणे –

जेव्हा गॅस गुदामार्गातून बाहेर जात नाही, तेव्हा तो तोंडातून बाहेर पडतो. पोटातील गॅसमध्ये पुढील लक्षणे जाणवू शकतात.

  • पोटात गॅस होण्यामुळे छातीत किंवा पोटात दुखु लागते.
  • छातीत व पोटात गच्च वाटू लागते.
  • पोट फुगल्यासारखे होते.
  • पोटातील गॅसमुळे अस्वस्थ वाटते.
  • पोटातील गॅस ढेकर येऊन बाहेर पडत असतो.
  • पोटातील गॅसमुळे काहीवेळा डोकेदुखी, एसिडीटी यासारखे त्रासही होऊ शकतात.

पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय –

  • एक चमचा ओवा ग्लासभर गरम पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे यामुळे पोटातील गॅस कमी होतो.
  • अर्धा चमचा ओवा आणि चिमुटभर सैंधव मीठ खाल्यास पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते.
  • पोटातील गॅस कमी करण्यासाठी एक चमचा जिरेपूड गरम पाण्यात मिसळून प्यावे.
  • पोटातील गॅस कमी होण्यासाठी लिंबू रसात आल्याचा रस मिसळून प्यावा.
  • पोटातील गॅस कमी करण्यासाठी अर्धा चमचा हिंग गरम पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे.
  • ग्लासभर पाण्यात आल्याचा तुकडा घालून ते पाणी उकळावे व कोमट झाल्यावर प्यावे.

हे घरगुती उपाय पोटातील गॅस कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पोटातील गॅस कमी करण्याचे ओवा, सैंधव, आले, लिंबू, हिंग यासारखे अनेक घरगुती पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात असतात. हे सर्व घरगुती उपाय पोटात गॅस होणे यावर फायदेशीर आहेत.

पोटात गॅस होऊ नये यासाठी घ्यायची काळजी –

नियमित व्यायाम करावा..
बैठी कामे असलेल्या लोकांनी रोज कमीत कमी अर्ध्या तासासाठी चालणे, पायऱ्या चढणे-उतरणे, सायकलिंग यासारखे व्यायाम केल्याने पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होतो. त्यामुळे घेतलेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते व गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या तक्रारी दूर होतात. व्यायामात योगासने, प्राणायाम यांचाही समावेश करू शकता.

पचनास जड असणारे पदार्थ खाणे टाळावे..
तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ, मांसाहार, हरभरा, मटार, बटाटा, कोबी इत्यादी पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. यामुळे पोट साफ होत नाही, अपचन होते त्यामुळे गॅसेसच्या तक्रारी होतात. यासाठी असे पदार्थ सतत खाणे टाळावे.

हलका आहार घ्यावा..
पोटात गॅस होण्याची समस्या असणाऱ्यांनी सहजतेने पचणारा, हलका आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्यां, ताजी फळे, फळभाज्या, दही, ताक यांचा आहारात समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या व फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असून ते पोट साफ होण्यास मदत करते त्यामुळे पोटात गॅस होत नाही.

चुकीच्या सवयी बदला..
एकाचवेळी भरपेट जेवणे टाळावे. जेवताना सावकाश व प्रत्येक घास चावून खावावा. गडबडीत, पटपट खाणे टाळावे. जेवणानंतर लगेच झोपू नये. तसेच दिवसा झोपू नये आणि रात्री जागरण करू नये. तंबाखू, सिगारेट, मद्यपान अशी सर्व प्रकारची व्यसनेही टाळावीत. ह्या टिप्सचे पालन केल्यास पोटात गॅस होण्याची समस्या होत नाही.

डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते ..?

पोटातील गॅस जर ढेकर येऊन बरे वाटत असेल तर डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. मात्र गॅस होणे याबरोबरच खालील त्रास जाणवत असल्यास तुम्ही डॉक्टरांना भेटावे.

हे सुद्धा वाचा..
बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न झाल्यानेही पोटात गॅस होत असतो. नियमित पोट साफ होण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.

Read Marathi language article about Stomach Gas causes, symptoms and Home remedies. Last Medically Reviewed on February 21, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.