नाक गळणे –
सर्दी पडसे झाल्यास नाक गळू लागते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी पडसे होत असते. तसेच थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास अधिक होत असतो.
सर्दी पडसे झाल्यास नाक गळणे, नाकातून पातळ किंवा घट्ट शेंबूड गळू लागणे, नाकाने श्वास घेण्यास त्रास होणे, अंग दुखणे, डोकेदुखी, खोकला व ताप येणे असे हैराण करून सोडणारे त्रास यावेळी होतात.
नाक गळणे यावरील घरगुती उपाय –
सर्दीमुळे नाक गळत असल्यास एक कप गरम दूधात एक चमचा हळद घालून ते दूध प्यावे.
आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्यानेही नाक गळणे कमी होते. तसेच सर्दीमुळे घशाला आलेली सूज आणि खोकलाही यामुळे कमी होतो.
सर्दीने नाक गळत असल्यास एक कप पाण्यात तुळशीची पाच-सहा पाने घालून त्यात आल्याचा तुकडा टाकून मिश्रण उकळावे व कोमट झाल्यावर प्यावे.
चमचाभर लिंबू रसात दोन चमचे मध घालून ते कोमट पाण्यातून प्यावे. यामुळे सर्दीमुळे नाक गळणे कमी होते.
काळी मिरी पावडर आणि सुंठीचं मिश्रण मधातून दिवसातून दोन ते तीन वेळा खाल्याने सर्दीमुळे नाक गळणे कमी होते.
हे सुध्दा वाचा – घसा दुखणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Runny nose home remedies. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.