H3N2 Virus Symptoms, Causes, Prevention and Treatments in Marathi.

H3N2 symptoms in Marathi article by Dr Satish Upalkar.

H3N2 व्हायरस –

देशात गेल्या काही दिवसांत ताप-सर्दी-खोकला यासारख्या फ्लूसदृश रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे. त्यातच H3N2 या इन्फ्लुएंझा व्हायरसचे काही रुग्ण आढळले आहेत. व्हायरसमध्ये काळानुसार बदल घडत असतात. त्यानुसार H3N2 व्हायरस हा H1N1 या इन्फ्लुएंझा व्हायरसचे बदललेले रूप (म्हणजेच म्युटेट स्ट्रेन) आहे. H3N2 व्हायरसची कोणती लक्षणे असतात व या व्हायरसपासून बचाव कसा करायचा याची माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी दिली आहे.

H3N2 ची लक्षणे – H3N2 symptoms in Marathi :

सर्दी, ताप, खोकला येणे, घसा दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, काहीवेळा मळमळ व उलट्या होणे जुलाब होणे अशी H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे असतात. ही लक्षणे पाच ते सात दिवस राहू शकतात असे, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने सांगितले आहे. H3N2 संसर्गाचा खोकला तीन आठवड्यांपर्यंत राहू शकतो तर ताप तीन दिवसांपर्यंत राहू शकतो.

H3N2 व्हायरस पासून बचाव कसा करावा?

  • परिसरात H3N2 साथ आल्यास अधिक काळजी घ्यावी.
  • मास्क आणि sanitizer यांचा वापर करावा.
  • बाहेरून आल्यावर हातपाय साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • हातानी चेहरा किंवा नाकाला स्पर्श करणे टाळा.
  • शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
  • आजारी व्यक्तींपासून दूर राहा.
  • सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात जाताना अधिक काळजी घ्यावी.
  • H3N2 बाधित असलेल्या व्यक्तीची काळजी घेताना मास्क, sanitizer आणि हातमोजे यांचा वापर करावा.
  • सर्दी, खोकला, ताप येणे, अंग दुखणे असे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
  • गंभीर आजाराचे रुग्ण, लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.
  • सामान्य फ्लू म्हणजे सर्दी-ताप-खोकला यासारखाच हा त्रास असून याविषयी अधिक भयभीत होऊ नये.

सर्दी खोकला वैगेरे त्रास होत असल्यास काय करावे?

  • ताप, सर्दी, खोकला, अशक्तपणा, जुलाब, अंगदुखी यापैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्या.
  • ताप किंवा खोकल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मर्जीने अँटिबायोटिक्स गोळ्या औषधे घेऊ नका.
  • लहान मुलांना ताप आल्यास किंवा अतिसार, उलट्या होत असल्यास डॉक्टरांकडे मुलाला घेऊन जावे.
  • खोकला, सर्दी किंवा ताप असेल तर बरे वाटेपर्यंत घरी थांबून आराम करावा.
  • पुरेसे पाणी प्यावे. तसेच शहाळ्याचे पाणी, सरबत, फळांचा ताजा रस असे द्रवपदार्थ देखील प्यावेत.
  • रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा पौष्टिक आणि योग्य आहार घ्यावा.
Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – H1N1 स्वाईन फ्ल्यूची लक्षणे, कारणे व उपचार जाणून घ्या..

2 Sources

In this article information about H3N2 Virus Symptoms, Causes, Prevention and Treatments in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *