डासांपासून होणारे आजार –

बाधित डास चावल्याने विशिष्ट आजार पसरत असतात. त्या आजारांना डासांपासून होणारे आजार (Mosquito-Borne Diseases) असे म्हणतात. डासांद्वारे झिका व्हायरस, वेस्ट नाईल व्हायरस, चिकनगुनिया व्हायरस, डेंग्यू आणि मलेरिया या रोगांचा प्रसार होत असतो.

डासांमुळे पसरणारे साथीचे रोग –

बॅक्टरीया किंवा व्हायरस बाधित डास चावल्यामुळे खालील सहा आजार प्रामुख्याने पसरत असतात.
1) मलेरिया किंवा हिवताप (Malaria)
2) डेंगू (Dengue fever)
3) चिकूनगुणिया (Chikungunya)
4) हत्तीपाय रोग (Lymphatic filariasis)
5) झिका व्हायरस (Zika fever)

मलेरिया किंवा हिवताप – Malaria :

मलेरिया हा एक संसर्गजन्य आजार असून तो डासांमुळे पसरत असतो. एनोफिलिस डासाची मादी चावल्यामुळे प्लाजमोडियम नावाच्या परजिवीमुळे मलेरिया होतो. ताप येणे, हुडहुडी भरणे, डोकेदुखी, उलट्या होणे अशी लक्षणे मलेरियामध्ये असतात. याच्या उपचारासाठी anti-malarial औषधे वापरली जातात. मलेरिया आजाराविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

डेंगू – Dengue fever :

डेंगू हा ‘एडीस इजिप्ती’ ह्या नावाच्या डासापासून पसरणारा गंभीर असा विषाणूजन्य आजार आहे. डेंगूचे डास प्रामुख्याने सकाळी व संध्याकाळी चावतात. या डासांची उत्पत्ति भांडी, टाक्या, फुलदाणी व टाकाऊ वस्तू यात साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्वचेवर पुरळ येणे, ताप येणे, डोकेदुखी, हिरड्यातून रक्त येणे यासारखी असतात. डेंगूची लक्षणे, कारणे, उपचार आणि घ्यावयाची काळजी याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

चिकनगुनिया – Chikungunya :

एडीस इजिप्ती आणि एडीस अल्बोपिक्टस मादी डासांच्यामुळे पसरणाऱ्या चिकुनगुनिया या आजारात थंडी वाजून ताप येणे, पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे असतात. चिकुनगुनियाचे डास प्रामुख्याने दिवसा म्हणजे सकाळच्या व दुपारच्या वेळी चावणारे असतात. चिकुनगुनिया विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

हत्तीपाय रोग – Lymphatic filariasis :

हत्तीरोग हा ‘बुचेरिया बॅनक्रॉप्‍टी’ या परोपजीवी बॅक्टेरियामुळे होत असतो. ह्या बॅक्टेरियाचा प्रसार ‘क्युलेक्स’ जातीच्या मादी डास चावल्याने होत असतो. डासांमार्फत बॅक्टेरिया रक्त व लसिका संस्थेत पोहचून हळूहळू आपली संख्या वाढवत असतात. त्यामुळे याची लक्षणे हळूहळू जाणवतात. यामध्ये पाय, हात आणि जननेंद्रिय यांच्या ठिकाणी सूज येते. शरीरात बॅक्टेरिया अधिक प्रमाणात वाडल्यास आजार वाढून पायाच्या ठिकाणी अतिशय सूज येऊन पाय हत्तीच्या पायासारखा (elephantiasis) वाटतो. हत्तीपाय रोगाची लक्षणे, कारणे, उपचार आणि घ्यावयाची काळजी याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

झिका व्हायरस – Zika fever :

झिका व्हायरस हा बाधित Aedes नावाच्या डासांपासून पसरणारा आजार आहे. हे डास दिवसा चावणारे असतात. प्रामुख्याने ब्राझील, दक्षिण अमेरिका याठिकाणी झिका व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक आढळतो. यामध्ये ताप येणे, अंगदुखी, पुरळ उठणे, डोळे लाल होणे अशी साधारण लक्षणे असतात. मात्र गरोदर स्त्रिया आणि पोटातील गर्भ यांच्यासाठी जास्त धोकादायक असा हा आजार आहे.

डासांपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना –

  • डासनाशक साधनांचा (Mosquito Repellent) वापर करावा.
  • झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
  • घरात डास येऊ नयेत यासाठी खिडक्यांना जाळ्या लावा.
  • घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.
  • घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नका. जेणेकरून डासांची पैदास थांबण्यास मदत होईल.
  • घरातील फिशटॅन्क, फुलदाणी यातील पाणी वेळोवेळी बदला.
  • परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाची साथ आलेली असल्यास अधिक काळजी घ्यावी.
Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

Name & List of diseases caused by mosquitoes in Marathi. Article written by Dr. Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...