प्रथमोपचार म्हणजे काय?
बऱ्याचवेळा पडणे, कापणे, भाजणे, बुडणे यासारखे छोटे-मोठे अपघात आपल्या आसपास घडत असतात. अशावेळी दवाखान्यात नेण्यापूर्वी कोणत्याही जखमी किंवा आजारी व्यक्तीवर जे आवश्यक उपचार केले जातात त्याला प्रथमोपचार किंवा प्राथमिक उपचार असे म्हणतात. आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी अशा प्राथमिक उपचारांची खूप मदत होऊ शकते.
प्रथमोपचार संबंधित हे लेख सुध्दा वाचा..
- प्रथमोपचार पेटी कशी तयार करावी?
- भाजल्यावर करायचे प्रथमोपचार
- जखम झाल्यास करायचे प्रथमोपचार
- हार्ट अटॅक वरील प्रथमोपचार
- उष्माघात वरील प्रथमोपचार
- साप चावणे यावरील प्रथमोपचार
प्रथमोपचार कधी करावे लागतात?
छोटे मोठे अपघात म्हणजे पडणे, कापणे अशा स्थितीत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी, जखमेतून इन्फेक्शन रोखण्यासाठी प्रथमोपचार करावे लागतात. तसेच रस्त्यावरील अपघात, पाण्यात बुडने, भाजणे, हाड मोडणे, हार्ट अटॅक, विषारी प्राणी चावणे अशा परिस्थितीत काही प्रथमोपचार करावे लागतात. त्यामुळे प्रथमोपचाराची माहिती प्रत्येकाला असली पाहिजे. दुर्घटनेच्या वेळी काय करावे तसेच काय करू नये याची माहिती प्रथमोपचारामध्ये समाविष्ट असते.
प्रथमोपचाराचा उद्देश –
जखमी किंवा आजारी व्यक्तीला लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा मिळवून देणे हाच प्रथमोपचाराचा मुख्य उद्देश आहे.
- जखम झाल्यास रक्तस्त्राव व इन्फेक्शन रोखण्यासाठी प्रयत्न करणे.
- जखमी किंवा आजारी व्यक्तीला मानसिक धक्का बसला असल्यास त्याला मानसिक आधार देणे.
- जर ती व्यक्ती बेशुद्ध पडली असल्यास तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करणे.
- गंभीर स्थितीमध्ये लवकरात लवकर रूग्णाला जवळच्या दवाखान्यात दाखल करावे.
- जवळ दवाखाना नसल्यास किंवा वाहतुकीचे साधन नसल्यास 108 ह्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी.
प्रथमोपचाराची गरज व प्रथमोपचाराचे महत्त्व –
- छोट्या मोठ्या जखमा झाल्यास रक्तस्त्राव किंवा इन्फेक्शन रोखण्यासाठी प्रथमोपचारामुळे मदत होते.
- प्रथमोपचारामुळे रूग्णाला मानसिक आधार मिळतो.
- प्रथमोपचारामुळे आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचे प्राण वाचवण्यास खूप मदत होते.
Read Marathi language article about first aid. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.