कापल्यावर करावयाचे प्रथमोपचार

2988
views

जखम लहान असू दे किंवा मोठी; त्यातून रक्त येण्याची दुर्घटना सर्रास घडतात. जखम झाल्यामुळे त्वचा फाटून रक्तप्रवाह होतो. काही वेळेस जखम मोठी असल्यास रक्त भळाभळा वाहतं अशावेळी काळजी घ्यायला हवी.

• जखमेतून खूप रक्तप्रवाह होत असल्यास जखमेवर हळद किंवा अँटीसेप्टिक पावडर, मलम किंवा डेटॉल लावा आणि त्यावर ड्रेसिंग पॅड व बँडेजपट्टी बांधा.
• ‎जखमी झालेला अवयव वर उचलून धरा जेणेकरून रक्तप्रवाह कमी होईल.
• ‎जर कापलेली जखम खोल असेल, तर त्वरीत डाँक्टर कडे जा. गंजलेल्या वस्तूने कापल्यास धनुर्वाताचे इंजेक्शन घेणे गरजेचे असते.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.