प्रथमोपचार (First aid) –
अनेकदा पडणे, कापणे, भाजणे असे छोटे-मोठे अपघात आपल्या आसपास घडत असतात. त्यामुळे जखम होत असते. अशावेळी जखेमतून होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी किंवा जखमेत इन्फेक्शन होऊ नये म्हणून प्रथमोपचार करावे लागतात. यासाठी आपल्या जवळ प्रथमोपचार पेटी असावी लागते. प्रथमोपचार पेटीमध्ये लागणाऱ्या आवश्यक साहित्याची नावे व यादी याठिकाणी दिली आहे.
प्रथमोपचाराची पेटी (First aid box) –
कधीही छोटे-मोठे अपघात होऊ शकतात. अशाप्रसंगी ऐनवेळी धावपळ होण्यापेक्षा आपल्या घरात प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. प्रथमोपचाराची पेटी मेडिकल स्टोअरमध्ये रेडिमेड स्वरूपात भेटू शकते. तसेच आपण घरीही प्रथमोपचार पेटी तयार करू शकता. प्रथमोपचार पेटीमध्ये पुढील साहित्य असणे गरजेचे आहे.
प्रथमोपचार पेटीतील आवश्यक वस्तूंची यादी –
- छोटी कात्री, चिमटा, लहान बॅटरी (torch),
- डेटॉल किंवा सॅव्हलॉन,
- अँटीसेप्टिक क्रीम व पावडर,
- वेगवेगळ्या आकारांच्या बँडेज पट्ट्या,
- गुंडाळता येणारी बँडेज पट्टी,
- जखमेवर बांधण्यासाठीची जाळीची पट्टी,
- कापूस,
- थर्मामीटर,
- पेट्रोलिअम जेली,
- साबण,
- काही सामान्य वेदनाशामक गोळ्या औषधे,
- फॅमिली डॉक्टर, जवळचे हॉस्पिटल आणि नातेवाइकांचे टेलिफोन नंबर
हे सर्व साहित्य प्रथमोपचार पेटीमध्ये असावे.
प्रथमोपचाराची पेटी ही सर्व लोकांना सहज मिळेल, अशा ठिकाणी ठेवावी. या पेटीवर ‘First aid box’ असे ठळक अक्षरात लिहावे. तसेच पेटीमधील मुदत संपालेली औषधे जबाबदारीने बदलावीत.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – प्रथमोपचाराचे महत्त्व जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
In this article information about First aid box items list in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).