सर्पदंश झाल्यास पुढील गोष्टी कराव्यात

3183
views

सर्पदंश झाल्यास पुढील गोष्टी कराव्यात :

 • सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मोकळ्या, स्वच्छ जागी हलवणे,
  साप चावलेल्या व्यक्तीला आडवे झोपवून शांत राहण्यास सांगितले पाहिजे.
  सर्पदंश झालेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्‍यता आहे, तिला मानसिक आधार द्यावा. कारण बऱ्याचदा साप बिनविषारी असतो. मात्र, केवळ भयाने रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो.
 • त्याचे मन बोलण्यात गुंतवावे. म्हणजे, मनावरचा ताण हलका होईल.
 • त्याला चालायला लावू नये. यामुळे विष लवकर पसरत नाही त्यामुळे विष शरीरभर जाण्याची प्रक्रिया मंद होईल.
 • जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. त्यावर जंतुनाशक लावावे.
 • तोंडाने रक्त शोषून विष उतरवण्याचे कोणतेही प्रयत्न मुळीच करू नयेत.
 • दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव होऊन व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.
 • जखमेवर बर्फ लावू नये. तसेच, जखम चोळू नये.
 • दंश झालेल्या ठिकाणाच्या थोडी वरच्या बाजूस एक आवळपट्टी बांधावी.
 • आवळपट्टी बांधताना दंड व दोरीच्या मध्ये पेन, काडी किंवा बोट चाकून बांधावे बांधल्यानंतर ते बाहेर काढावे.
 • दर 15 ते 20 मिनिटांनंतर आवळपट्टी 15 सेकंदांसाठी सोडावी व पुन्हा त्याच पद्धतीने बांधावी. त्यामुळे आवश्यक त्या रक्ताभिसरणात अडचण तर येणार नाही पण रक्तातील विष भिनण्यात अडथळा येईल. पट्टी थोडी सैल ठेवावी. म्हणजे, त्या भागातील मुख्य रक्तप्रवाह थांबणार नाही.
 • सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारू पाजू नये.
 • सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तत्काळ दवाखान्यात दाखल करा. त्याला वाहनाने रुग्णालयात न्यावे. चालत किंवा घाईने धावत नेऊ नये.
 • डॉक्टरांकडे गेल्यावर दंश झालेल्या व्यक्तीस दमा अथवा कोणतीही अ‍ॅलर्जी अथवा एकादा आजार असल्यास डॉक्टरांना कळवावे.

सर्पदंशावर एकमेव उपाय म्हणजे प्रतिसर्पविष (स्नेक अँटिव्हेनिन) हेच होय, जे शासकीय सामान्य रुग्णालयात मोफत दिले जाते.
सर्पदंशावर हाफकिनचे ‘अँन्टीस्नेक वेनम सिरम'(asvs) हे अतिशय प्रभावी औषध आहे. तशीच इतरही औषधे उपलब्ध आहेत.

सर्पदंशाच्या प्रसंगी काय करू नये?

 • मांत्रिकाच्या मागे लागून वेळ फुकट घालवू नका. सापाचे विष मंत्राने उतरवता येत नाही.
 • सर्पदंश झालेल्या जागेवर कोणतीही औषधी वनस्पती उगाळून लावू नका
 • रक्तप्रवाह थांबेल अशी आवळपट्टी अवयवास बांधू नका. यामुळे त्या अवयवाचा रक्तपुरवठा थांबूही शकतो. त्यामुळे अवयव कायमचा निकामी होऊ शकतो.
 • जखमेतून रक्त काढू नये, तसेच जखम कापू नये किंवा चोखू नये. याचा काहीही उपयोग नसतो. उलट ते घातकच ठरू शकते.
 • सर्पदंश झालेल्या जागेवर गरम केलेले लोखंड लावणे (डागण्या देणे) चुकीचे आहे तसे करू नका.
 • एक उपाय म्हणून काही लोक एकामागे एक कोंबड्यांचे गुदद्वार जखमेला दाबून लावतात. याचा काहीच उपयोग नसतो. फक्त कोंबड्या मरतात.

आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.