ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit or Pitaya) –

ड्रॅगन फ्रूट हे एक चवदार आणि पोषक घटकानी समृद्ध असे फळ आहे. हे फळ दक्षिण आणि मध्य अमेरिका, मेक्सिको आणि युरोपीय देशांमध्ये येते. ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन ई, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यासारख्या पोषक तत्वांचा भरपूर साठा असतो.

ड्रॅगन फ्रूट खाण्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. कोलेस्टेरॉल कमी होते. रक्तदाब नियंत्रित राहतो. रक्तातील साखर नियंत्रित राहते. कर्करोग, हृदयरोग अशा आजारांपासून रक्षण होते. यात असणाऱ्या फायबर मुळे पोट साफ होते व वजन कमी होते.

ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे –

1) ड्रॅगन फ्रूट खाण्यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. व्हिटॅमिन सी हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असते. या अँटिऑक्सिडेंटमुळे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण मिळते. यामुळे कर्करोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांचा धोका कमी होतो. तसेच व्हिटॅमिन सी मुळे इम्युनिटी देखील वाढते. रोग प्रतिकारशक्ती वाढल्याने सर्दी, पडसे, खोकला यासारखे आजार सहसा होत नाही.

2) ड्रॅगन फ्रूट खाण्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
ड्रॅगन फ्रूटमध्ये पोटॅशियम भरपूर असते, जे हृदयरोगाचा धोका कमी करते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. तसेच ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबर भरपूर असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहिल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो.

3) ड्रॅगन फ्रुट खाण्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो
ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडेंट भरपूर असतात, जे कर्करोगाचा धोका कमी करतात. अँटिऑक्सिडेंटमुळे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण मिळते. यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत होते शकते.

4) ड्रॅगन फ्रूटमुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडेंट भरपूर असतात, जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात.

5) ड्रॅगन फ्रूट खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबर भरपूर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. फायबर शरीराला अन्न पचवण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करते. त्यामुळे ड्रॅगन फ्रूट खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

6) ड्रॅगन फ्रुट खाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
ड्रॅगन फ्रूटचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने रक्तातील साखर जास्त वाढत नाही. किंबहुना यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत होत असते. ड्रॅगन फ्रूट हे मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते.

7) ड्रॅगन फ्रूट खाण्यामुळे वजन आटोक्यात राहते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर भरपूर असते. ज्यामुळे भूक नियंत्रित होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

ड्रॅगन फ्रूट कसे खावे..?

ड्रॅगन फ्रूट कापून त्याची साल काढून टाकावी. आत असणारा पांढऱ्या रंगाचा गर खावा. जास्त प्रमाणात ड्रॅगन फ्रूट खाणे टाळावे.

ड्रॅगन फ्रुट खाण्याचे तोटे –

ड्रॅगन फ्रूटमध्ये काही प्रमाणात अँथिसिड असते, ज्यामुळे ड्रॅगन फ्रूट नंतर पोटात जळजळ होऊ शकते. तसेच यामुळे काही लोकांना एलर्जी देखील होऊ शकते. ड्रॅगन फ्रूट जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोट बिघडू शकते. यामुळे जुलाब, उलट्या, पोटदुखी असे त्रास होऊ शकतात.

ड्रॅगन फ्रूट कोणी खाऊ नये..?

  • जर तुम्हाला पोटात जळजळ होण्याचा किंवा अल्सरचा त्रास असल्यास तुम्ही ड्रॅगन फ्रूट खाऊ नका.
  • ड्रॅगन फ्रूटची एलर्जी असणाऱ्यांनी हे फळ खाऊ नये.
  • गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे फळ खाऊ नये.

ड्रॅगन फ्रूटमधील पोषण मूल्ये (Dragon fruit Nutritional value) –

ड्रॅगन फ्रूटमध्ये खालीलप्रमाणे पोषक मूल्ये असतात.

कॅलरीज: 60
फॅट: 0.1 ग्रॅम
कोलेस्टेरॉल: 0 मिग्रॅ
सोडियम: 1 मिग्रॅ
कार्बोहायड्रेट: 15 ग्रॅम
फायबर: 3 ग्रॅम
साखर: 12 ग्रॅम
प्रथिने: 1 ग्रॅम
व्हिटॅमिन सी: 28% RDA
व्हिटॅमिन बी 6: 10% RDA
मॅग्नेशियम: 6% RDA
पोटॅशियम: 4% RDA
फॉस्फरस: 3% RDA

हे सुध्दा वाचा – किवी फळ खाण्याचे फायदे जाणून घ्या..

Dragon fruit contains the antioxidants vitamin C, beta-carotene and lycopene. Read Marathi language article about Dragon Fruit Benefits, side effects and How to Eat. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *