नाशपाती (Pears) –

नाशपाती हे एक आरोग्यदायी असे फळ असून ते अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. नाशपाती फळात कमी कॅलरीज असतात तर यात फायबर आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.

Image of Pears fruits.

नाशपाती फळ आरोग्यासाठी फायदेशीर असते. ह्यामुळे वजन आटोक्यात राहते. यामुळे रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. हृदयासाठी हे फळ चांगले असते. यात असणाऱ्या फायबरमुळे पोट साफ होते. यातील अँटिऑक्सिडेंटमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते, कॅन्सरचा धोका कमी होतो. नाशपाती खाण्यामुळे त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

नाशपाती फळ खाण्याचे फायदे –

1) नाशपाती खाण्यामुळे वजन कमी होते.
नाशपातीमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असते. फायबरमुळे भूक कमी लागते. नाशपाती खाण्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे भूक कमी लागते. आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

2) नाशपाती खाण्यामुळे हृदयरोगाचे धोका कमी होतो.
नाशपातीमध्ये पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. ह्या दोन्ही घटकांमुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. कारण पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, तर फायबरमुळे कोलेस्टेरॉल कमी होत असते. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहिल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. त्यामुळे नाशपाती फळ हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

3) नाशपाती खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
नाशपातीमध्ये कॅरोटीनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स यासारखे अँटिऑक्सिडेंट असतात. अँटिऑक्सिडेंटमुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखली जाते. यामुळे कर्करोगापासून दूर राहण्यास मदत होते.

4) नाशपाती खाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते
नाशपातीमध्ये फायबर जास्त असते. फायबरमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्यामुळे टाइप 2 डायबेटिसपासून दूर राहण्यास मदत होते. तसेच मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी हे फळ चांगले असते.

5) नाशपाती खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते.
नाशपातीमध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होते. तसेच यामुळे अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि इतर आतड्याच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

6) नाशपाती खाण्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते.
नाशपातीमध्ये अँटिऑक्सिडेंट भरपूर असतात. अँटिऑक्सिडेंट हे फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण करतात. यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या पडत नाहीत.

7) नाशपाती खाण्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
नाशपाती फळात विटामिन सी भरपूर असते, जे दृष्टी सुधारण्यास मदत करते. विटामिन सी मुळे डोळ्यांना फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते, ज्यामुळे डोळ्यांच्या विविध समस्या होण्याचा धोका कमी होतो.

8) नाशपाती खाण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
नाशपाती फळात विटामिन सी भरपूर असते. विटामिन सी मुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यास सर्दी, पडसे, खोकला असे त्रास सहसा होत नाहीत.

9) नाशपाती खाण्यामुळे अल्झायमरचा धोका कमी होतो.
नाशपाती फळात अँटिऑक्सिडेंट भरपूर असतात, जे अल्झायमर आजाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.

नाशपाती फळ खाण्याचे तोटे –

नाशपाती फळ हे एक पौष्टिक फळ आहे, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्यास काही त्रास होऊ शकतात. नाशपाती फळ जास्त खाल्याने पोटात दुखणे, पोट बिघडणे, जुलाब लागणे, उलट्या होणे असे त्रास होऊ शकतात.

नाशपाती फळ कसे खावे?

नाशपाती फळ हे कच्चे खाल्ले जाते. याशिवाय तुम्ही ते शिजवून खाऊ शकता किंवा फळाचा रस करून पिऊ शकता. नाशपाती फळ हे विविध पाककृती जसे सॅलड, स्मूदी यामध्ये वापरले जाते.

नाशपाती फळे दररोज किती खावीत?

नाशपाती फळ हे एक पौष्टिक फळ आहे, परंतु ते जास्त खाणे टाळावे. दररोज 1 किंवा 2 नाशपाती फळे खाणे पुरेसे आहे.

नाशपाती फळातील पोषण मूल्ये (Pears Nutritional value)

एक मध्यम आकाराच्या नाशपाती फळात खालील पोषक घटक असतात.
कॅलरीज: 101
चरबी: 0.3 ग्रॅम
सोडियम: 1.8 मिलीग्रॅम
कार्बोहायड्रेट: 27 ग्रॅम
फायबर: 5.5 ग्रॅम
साखर: 17 ग्रॅम
प्रथिने: 0.6 ग्रॅम
फॉलेट: 59 माइक्रोग्रॅम (14% डीव्ही)
विटामिन सी: 12.4 मिलीग्रॅम (15% डीव्ही)
विटामिन के: 7.8 माइक्रोग्रॅम (10% डीव्ही)
पोटॅशियम: 206 मिलीग्रॅम (5% डीव्ही)
तांबे: 0.2 मिलीग्रॅम (16% डीव्ही)

हे सुध्दा वाचा – एवोकॅडो फळ खाण्याचे फायदे जाणून घ्या..

Pears are especially rich in folate, vitamin C, copper, and potassium. They’re also a good source of polyphenol antioxidants. Read Marathi language article about Pears or nashpati fruit benefits and side effects. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *