यकृत हे शरीरातील एक अतिमहत्वाचे असे अवयव आहे. पचनक्रिया, रक्तसंचारण क्रियेमध्ये यकृताची महत्वाची अशी भुमिका असते. खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे त्यानंतर त्याचे रस, रक्तादी धातूत रुपांतर करण्यासाठी यकृताचे महत्वपूर्ण योगदान असते.
याशिवाय शरीरातील अपायकारक विषारी घटकांचे निचरा करण्याचे महत्वपुर्ण कार्य हे यकृतावरच अवलंबुन असते. म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी यकृताचे आरोग्य चांगले असणे आवश्यक असते.
अयोग्य आहाराच्या सेवनामुळे यकृतामध्ये बिघाड निर्माण होतो. यकृताच्या कार्यास अडथळा निर्माण झाल्यास अनेक प्रकारचे यकृत विकार उद्भवतात. जसे, यकृताचा आकार वाढणे, यकृताला सुज येणे हिपॅटायटीस, लिव्हर सिरोसिस, यकृताचा कैन्सर, कावीळ या सारखे यकृत विकार उद्भवतात.
यकृताच्या आरोग्यासाठी योग्य आणि अयोग्य आहार :
- पित्तशामक आहार घ्यावा. पित्तवर्धक उष्ण, तीक्ष्ण, अतितिखट, खारट, आंबट, मसालेदार आहारामुळे यकृताचे आरोग्य बिघडते.
- पचण्यास जड, तेलकट, चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे टाळावे.
- स्निग्ध पदार्थांचे मर्यादितच वापर करावा. चरबीयुक्त, स्निग्ध पदार्थांच्या अतिसेवनामुळे रक्तातील चरबीचे आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते त्यामुळे फैटी लिव्हर हा यकृत विकार उद्भवतो.
- मद्यपान, तंबाखू, सुपारी, दुषित पदार्थ, रासायनिक घटकांचा अंश असणारे पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
Read Marathi language article about Diet plan for Healthy Liver. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 8, 2024.