प्लेसेंटा प्रिव्हिया म्हणजे काय (Placenta previa) : प्रेग्नन्सीमध्ये आई आणि बाळ यांना साधणारा दुवा म्हणजे वार (प्लेसेंटा). गर्भावस्थेत पिशवीमध्ये बहुतांशवेळा वरील बाजूस ‘प्लेसेंटा’ असावी लागते. परंतु काहीवेळा प्लेसेंटाची पोझिशन ही पिशवीच्या खालच्या बाजूस असते. म्हणजे ती पिशवीच्या तोंडाजवळ असते. अशावेळी त्या स्थितीस ‘प्लेसेंटा प्रिव्हिया’ असे म्हणतात. प्लेसेंटा प्रिव्हियामुळे गरोदरपणात ‘वार’ ही पिशवीपासून सुटण्याची शक्यता असते. […]
Pregnancy problem
गर्भावस्थेत ऍनिमिया होण्याची कारणे, लक्षणे व उपचार
गरोदरपणातील रक्ताल्पता (Anemia in Pregnant women) : अॅनिमिया म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिन हे लाल पेशीमधील महत्वाचा भाग असते. या पेशींच्याद्वारे ऑक्सिजन शरीरभर पुरविला जातो. त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यास शरीरास ऑक्सिजन कमी मिळतो आणि पुढील अनेक समस्या निर्माण होतात. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी आयर्न म्हणजे लोहाची गरज असते. गर्भावस्थेत हिमोग्लोबिन कमी होणे : गर्भाशयात […]
Preeclampsia: गरोदरपणात प्रीक्लेम्पसिया होण्याची कारणे, लक्षणे व उपचार
प्रीक्लेम्पसिया म्हणजे काय? काही स्त्रियांना गरोदरपणात ‘प्री-एक्लेम्पसिया’चा त्रास होत असतो. गरोदरपणात पायांवर, हातांवर, चेहऱ्यावर खूप सूज येणे व ब्लडप्रेशर खूप वाढलेले असल्यास ‘प्री-एक्लेमप्सिया’ ही गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. ही एक गंभीर स्थिती असून यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्यास धोका असतो. यासाठी ‘प्री-एक्लेमप्सिया’वर वेळीच योग्य उपचार होणे आवश्यक असते. प्री-एक्लेम्पसिया कारणे (Preeclampsia causes) : गर्भावस्थेत […]
गरोदरपणात मुळव्याध होण्याची कारणे व उपाय
गर्भावस्थेतील मुळव्याध (Piles) : गरोदरपणात मूळव्याध होण्याची समस्या अनेक स्त्रियांना असते. कारण प्रेग्नन्सीमध्ये बद्धकोष्ठता किंवा शौचास साफ न होण्यामुळे मलाचा खडा धरत असतो. शौचावेळी जास्त जोर लावल्याने मूळव्याध (piles) होऊ शकते. याशिवाय प्रेग्नन्सीमध्ये गुदाच्या शिरांना सूज येऊ शकते तसेच प्रसूतीच्या वेळी जास्त जोर लावल्याने किंवा गुदाच्या ठिकाणी जखम झाल्याने मुळव्याधचा त्रास होत असतो. मूळव्याधची लक्षणे […]
गर्भावस्थेत वारंवार लघवीला होण्याची कारणे व उपाय
गरोदरपणात वारंवार लघवीला होणे : बहुतांश स्त्रियांना गर्भावस्थेत वारंवार लघवीला होत असते. गर्भावस्थेतील ही एक सामान्य समस्या असते. विशेषतः पहिल्या आणि शेवटच्या तीन महिन्यात लघवीला वारंवार होत असते. हार्मोनल बदल आणि वाढणाऱ्या गर्भाचा दबाव मूत्राशयावर पडत असल्याने प्रेग्नन्सीमध्ये लघवीला वारंवार होत असते. गरोदरपणात वारंवार लघवीला होऊ नये यासाठी पाणी कमी प्यावे का..? लघवीला सारखे जावे […]
गरोदरपणात लघवीला जळजळ होण्याची कारणे व उपाय
गर्भावस्थेत लघवीला जळजळ होणे : अनेक गरोदर महिलांना गरोदरपणात लघवीला जळजळ होत असते. प्रेग्नन्सीमध्ये लघवीला जळजळ होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. कारण हा त्रास प्रामुख्याने मूत्रमार्गात संसर्ग झाल्याने होत असतो. याला यूरीनरी ट्रैक्ट इनफेक्शन (UTI) असे म्हणतात. विशेषतः मूत्रमार्गाची स्वच्छता न राखल्यास त्याठिकाणी बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाल्याने लघवीला जळजळ होत असते. मूत्रमार्गात इन्फेक्शन […]
गरोदरपणात छातीत धडधड होण्याची कारणे व उपाय
गर्भावस्थेत छातीत धडधडणे : गरोदर असताना पोटात वाढणाऱ्या बाळाला पोषण देण्यासाठी आपले शरीर जास्त परिश्रम करत असते. गर्भावस्था जसजशी वाढत जाईल तसतसे आपल्या बाळास पोषणाची आवश्यकता वाढत असते. बाळाचे पोषण आईच्या रक्ताद्वारे होत असते. त्यामुळे शरीरात रक्ताची मागणी वाढल्याने आपले हृदय जास्त रक्त पंप करण्यास सुरूवात करते. त्यामुळे हृदयाची धडधड वाढू लागते. प्रेग्नन्सीमध्ये छातीत धडधड […]
गरोदरपणात छातीत जळजळ होण्याची कारणे व उपाय
गर्भावस्थेत छातीत जळजळणे (Acidity) : अनेक महिलांना गरोदरपणात ऍसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या होत असते. प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे ही समस्या होते. शेवटच्या तीन ते चार महिन्यात अनेक स्त्रियांना याचा त्रास होत असतो या त्रासाचा कोणताही विपरीत परिणाम बाळाच्या आरोग्यावर होत नाही. गरोदरपणात छातीत जळजळ होणे यावरील उपाय : 1) चुकीचा आहार टाळावा.. गर्भावस्थेत […]
गरोदरपणात झोप लागत नसल्यास हे करावे उपाय
गर्भावस्थेत झोप न येणे : अनेक गरोदर स्त्रियांना व्यवस्थित झोप न लागणे ही समस्या असते. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा आरामदायी स्थितीत झोपता न आल्याने, वारंवार लघवीला उठावे लागल्याने किंवा रात्री झोपल्यावर पायात गोळा आल्याने झोपमोड होऊन गर्भावस्थेत झोप लागत नाही. मात्र गरोदरपणात पुरेशी झोप व विश्रांती घेणे आवश्यक असते. यासाठी गर्भावस्थेत रात्रीच्या वेळी किमान आठ तास झोप […]
गरोदरपणातील दातदुखी – गर्भावस्थेत हिरड्या सुजणे, दात दुखणे यावर उपाय
गरोदरपणातील दातदुखी : हिरड्यांना सूज येणे किंवा दात दुखणे ही गर्भावस्थेत होणारी एक सामान्य समस्या आहे. गरोदरपणातील हार्मोन्समुळे हिरड्यांना सूज येते व त्याठिकाणी वेदना देखील होऊ लागतात. फ्लॉस किंवा ब्रश करताना हिरड्यातून रक्तही होऊ शकते. या त्रासाला प्रेग्नन्सीतील जिंजिविटिस असे म्हणतात. गरोदरपणात दात दुखणे यावरील उपाय : सकाळी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी असे दोनवेळा दात […]