गरोदरपणात वारंवार लघवीला होणे :
बहुतांश स्त्रियांना गर्भावस्थेत वारंवार लघवीला होत असते. गर्भावस्थेतील ही एक सामान्य समस्या असते. विशेषतः पहिल्या आणि शेवटच्या तीन महिन्यात लघवीला वारंवार होत असते. हार्मोनल बदल आणि वाढणाऱ्या गर्भाचा दबाव मूत्राशयावर पडत असल्याने प्रेग्नन्सीमध्ये लघवीला वारंवार होत असते.
गरोदरपणात वारंवार लघवीला होऊ नये यासाठी पाणी कमी प्यावे का..?
लघवीला सारखे जावे लागते म्हणून त्यावर पाणी कमी पिणे हा उपाय होऊ शकत नाही. कारण गरोदरपणात पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते. त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. यासाठी साधारण 8 ग्लास पाणी दिवसभरात वरचेवर पिणे आवश्यक असते. लघवीला वारंवार होत असल्यास चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.
गर्भावस्थेत रात्री वारंवार लघवीला जावे लागू नये यासाठी काय करावे..?
रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी पाणी पिणे टाळावे. तसेच झोपण्यापूर्वी लघवीला जाऊन यावे.
डॉक्टरांकडे केंव्हा जावे..?
गरोदरपणात वारंवार लघवीला होणे ही सामान्य गोष्ट असते. मात्र जर लघवीला जळजळ किंवा वेदना होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे जावे. कारण ही लक्षणे मूत्रमार्गातील संसर्ग (UTI) संबंधित असू शकतात.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात होणाऱ्या मूत्रमार्गातील संसर्ग किंवा UTI या त्रासाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Frequent Urination During Pregnancy information in Marathi. Article written by Dr. Satish Upalkar.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.