गर्भावस्थेत छातीत धडधड होण्याची कारणे व त्यावरील उपाय

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गर्भावस्थेत छातीत धडधड होणे :

गरोदर असताना पोटात वाढणाऱ्या बाळाला पोषण देण्यासाठी आपले शरीर जास्त परिश्रम करत असते. गर्भावस्था जसजशी वाढत जाईल तसतसे आपल्या बाळास पोषणाची आवश्यकता वाढत असते. बाळाचे पोषण आईच्या रक्ताद्वारे होत असते. त्यामुळे शरीरात रक्ताची मागणी वाढल्याने आपले हृदय जास्त रक्त पंप करण्यास सुरूवात करते. त्यामुळे हृदयाची धडधड वाढू लागते.

प्रेग्नन्सीमध्ये छातीत धडधड होण्याची कारणे :

बाळाला आणि आईला पर्याप्त मात्रेत रक्ताचा पुरवठा व्हावा यासाठी आईच्या शरीरात गरोदरपणात रक्ताचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे छातीत धडधड किंवा हार्टबीट वाढत असते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

तसेच हिमोग्लोबिनचयस कामात्रतेमुळेही छातीत धडधड वाढू शकते गर्भावस्थेत तणाव आणि भीतीमुळेही काहीवेळा छातीत धडधड होत असते. याशिवाय प्रोजेस्टेरोन हार्मोनमुळेही छातीत धडधड होत असते.

गरोदरपणात छातीत धडधडत असल्यास हे करा उपाय :

• मानसिक ताण घेऊ नये.
• चहा, कॉफी, चॉकलेट यांचे प्रमाण कमी करावे.
• तिखट, मसालेदार किंवा जड पदार्थ खाण्याने गॅसेस, ऍसिडिटी सारख्या समस्या होऊन छातीत अस्वस्थ वाटून धडधड होऊ शकते. यासाठी रात्रीचा आहार हलका असावा.
• रोज सकाळी मोकळ्या हवेत फिरण्यास जावे.
• गरोदरपणात दिलेल्या लोहाच्या गोळ्या वेळेवर घ्याव्यात.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Heart Palpitations During Pregnancy information in Marathi.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.