गर्भावस्थेत झोप लागत नसल्यास हे करावे उपाय – (Pregnancy Sleep problems in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गर्भावस्थेत झोप न येण्याची समस्या :

अनेक गरोदर स्त्रियांना व्यवस्थित झोप न येण्याची समस्या असते. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा आरामदायी स्थितीत झोपता न आल्याने, वारंवार लघवीला उठावे लागल्याने किंवा रात्री झोपल्यावर पायात गोळा आल्याने झोपमोड होऊन झोप लागत नाही.

मात्र गरोदरपणात पुरेशी झोप व विश्रांती घेणे आवश्यक असते. यासाठी गर्भावस्थेत रात्रीच्या वेळी किमान आठ तास झोप घ्यावी लागते. तसेच प्रेग्नन्सीमध्ये दुपारीही काहीवेळ म्हणजे एक ते दीड तास झोप घेणे आवश्यक असते. यासाठी गरोदरपणात झोप लागत नसल्यास काय करावे याची माहिती खाली दिली आहे.

गरोदरपणात झोप न येत असल्यास असे करा उपाय :

वेळेवर झोपा..
रोज रात्री वेळेवर झोपण्याची सवय लावून घ्या. रात्री विनाकारण जागरण करणे टाळावे. झोपण्यापूर्वी वाटीभर गरम दूध प्यावे.

योग्य आहार घ्या..
दिवसभरात वारंवार चहा, कॉफी पिणे टाळावे. यामुळे झोपेच्या तक्रारी वाढतात. पचनास जड पदार्थ, मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ रात्री खाणे टाळावे.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

तेल मालीश करा..
झोपण्यापूर्वी डोक्याला तेल लावून हलकी मालीश केल्याने आरामदायी झोप लागण्यास मदत होते.

डाव्या कुशीवर झोपा..
गरोदरपणी पोटाचा आकार वाढल्याने झोपण्यास अडचण होऊ शकते. अशावेळी प्रेग्नन्सीमध्ये डाव्या कुशीवर झोपणे आरामदायक वाटू शकते. येथे क्लिक करा व गरोदरपणात कशी झोप घ्यावी याविषयी माहिती जाणून घ्या..

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

नियमित व्यायाम करा..
गरोदरपणात डॉक्टरांनी सांगितलेला हलका व्यायाम करणे आवश्यक असते. विशेषतः चालण्याचा सोपा व्यायाम करावा. यामुळे शरीरात रक्त संचरण व्यवस्थित होते तसेच रात्री आरामदायक झोप येते.

प्रेग्नन्सीमध्ये झोपेची औषधे घ्यावीत का..?

प्रेग्नन्सीमध्ये आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोप येण्यासाठी कोणतीही औषधे किंवा हर्बल औषध घेऊ नका. यापैकी बरीच औषधे ही गर्भारपणात हानिकारक अशी असतात.

Insomnia and Sleep problems in Marathi.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.