लघवीच्या जागी आग होणे –

कधीकधी लघवीच्या वेळी आग होते. याची अनेक कारणे असू शकतात. मूत्रमार्गात बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाल्यामुळे हा त्रास होत असतो. लघवीच्या जागी आग होणे ही समस्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही प्रभावित करते. तथापि, महिलांना हा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी लघवीच्या वेळी आग होते. त्याबरोबरच वारंवार लघवीची इच्छा होणे, ताप येणे, लघवीच्या ठिकाणी वेदना होणे असे काही त्रास व लक्षणे यामध्ये जाणवू लागतात.

लघवीच्या जागी आग कशामुळे होते ..?

लघवीच्या जागी आग होण्याची कारणे अनेक असतात. खालील काही कारणांमुळे हा त्रास प्रामुख्याने होत असतो.

  • मूत्रमार्गात जिवाणूच्या संसर्गामुळे लघवीच्या जागी आग होते. विशेषतः अस्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्याने मूत्रमार्गातील संसर्गाचा धोका वाढतो.
  • कमी पाणी प्यायल्याने लघवीला आग होण्याचा त्रास होऊ शकतो.
  • लघवी वेळेवर न केल्याने किंवा जास्त वेळ लघवी रोखून धरण्याच्या सवयीने लघवीच्या जागी आग होते.
  • वेदनाशामक औषधांमुळे लघवीच्या जागी आग होऊ लागते.
  • ताप, सर्दी, जुलाब , अतिसार किंवा उलट्या यामुळे शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीच्या जागी आग होऊ लागते.
  • मूत्रमार्ग स्वच्छ न ठेवल्यास किंवा लघवीची जागा स्वच्छ ठेवण्यासाठी रासायनिक साबण वापरल्याने लघवी करताना आग होऊ लागते.
  • मुतखड्यामुळेही लघवीच्या ठिकाणी आग होऊ शकते.
  • प्रोस्टेट ग्रंथीला सूज येणे यांमुळे पुरुषांमध्ये लघवी करताना आग होण्याची शक्यता असते.
  • क्लॅमिडीया, गोनोरिया आणि सिफिलीस यांसारख्या लैंगिक संक्रमित रोगांमुळे देखील लघवीच्या ठिकाणी आग होऊ शकते.

लघवीच्या जागी आग होणे यावर घरगुती उपाय –

लघवीच्या जागी आग होत असल्यास पुरेसे पाणी प्यावे. यामुळे लघवी साफ होऊन होणारी आग कमी होते. यासाठी दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी प्यावे. धणे आणि जिरे याचे पाणी पिण्यामुळे देखील लघवीच्या ठिकाणी होणारी आग कमी होते. यासाठी रात्रभर पाण्यात धने व जिरे भिजत घालावे व सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावे. तसेच गरम पाण्याच्या पिशवीने ओटीपोटावर शेक घेण्यामुळेही हा त्रास कमी होतो. लघवीच्या ठिकाणी आग होणे यावर हे घरगुती उपाय उपयुक्त ठरतात.

लघवीला आग होत असल्यास काय करावे..?

1) पुरेसे पाणी प्यावे.
पुरेसे पाणी प्यायल्याने लघवी साफ होते आणि मूत्रमार्गातील बॅक्टेरिया बाहेर पडतात. यामुळे लघवीला आग होत असेल तर भरपूर पाणी प्या. दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक असते.

2) द्रवपदार्थ प्यावेत.
लघवीच्या जागी आग होत असल्यास शहाळ्याचे पाणी, ताज्या फळांचा रस आणि उसाचा रस प्या. हे द्रवपदार्थ पाण्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते आणि लघवीतील बॅक्टेरिया निघून जातात.

3) धणे आणि जिरे याचे पाणी प्यावे.
अर्धा चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे एका ग्लास पाण्यात मिसळून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे मिश्रण गाळून उरलेले पाणी प्या. या आयुर्वेदिक उपायाने लघवीच्या जागी आग होणे कमी होते.

4) गरम पिशवीने ओटीपोटावर शेक घ्यावा.
लघवीला आग होत असल्यास, गरम पाण्याच्या पिशवीने ओटीपोटावर शेक घ्यावा.

5) व्हिटॅमिन-सी ने समृद्ध असणारी फळे खा.
लघवी करताना आग होय असेल तर आवळा, संत्री, लिंबू, केळी, टरबूज, पेरू, किवी अशी फळे खावीत. कारण त्यात व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन-सीमुळे लघवीच्या जागी आग होणे कमी होते.

लघवीच्या जागी आग होत असेल तर डॉक्टरांना कधी भेटावे..?

लघवीच्या जागेवर आग होणे यावरील उपचार –

जर लघवीच्या जागी आग ही जिवाणू संसर्गामुळे होत असेल तर, त्यावरील उपचारासाठी अँटीबायोटिक औषधे डॉक्टर लिहून देतील. तसेच ताप किंवा लघवीच्या जागी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी सुध्दा औषधे दिली जातात. आणि मूतखडा किंवा प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणे, प्रोस्टेटला सूज येणे अशा कारणांनी लघवीला आग होत असल्यास त्यावर औषध उपचार उपयोगी ठरत नसल्यास ऑपरेशनद्वारे यावर उपचार केले जातात.

लघवीला आग होऊ नये यासाठी काय करावे ..?

  • दररोज किमान सात ते आठ ग्लास पाणी प्या.
  • सोडायुक्त शीतपेये, कॅफिन आणि अल्कोहोल पिणे टाळा.
  • जास्त वेळ लघवी रोखून ठेऊ नका. वेळच्यावेळी लघवीला जावे.
  • लघवीच्या जागेची योग्य प्रकारे स्वच्छता ठेवा.
  • स्वच्छ आणि सुती अंडरवेअर वापरा.
  • अस्वच्छ सार्वजनिक शौचालये वापरणे टाळा.
  • डोकेदुखी , अंगदुखीसाठी वारंवार पेनकिलर गोळ्या औषधे घेणे टाळा.

अशी खबरदारी घेतल्यास लघवीच्या ठिकाणी आग होत नाही.

हे सुध्दा वाचा – मूतखडा होण्याची कारणे, लक्षणे व उपचार जाणून घ्या..

Read Marathi language article about Burning Sensation in urine Causes, Treatment and Home remedies. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *