बाळाला उलटी होणे :
काहीवेळा बाळाला दूध प्यायल्याबरोबर लगेच उलटी होऊ शकते. नवजात बाळास दूध पिल्यानंतर होणारी उलटी हे फारसे काळजीचे कारण असत नाही. मात्र जर बाळास वारंवार उलट्या व जुलाब होत असतील तर ते मात्र काळजीचे कारण असू शकते, अशावेळी त्यावर उपचार करणे आवश्यक असते.
लहान बाळाला उलटी का होते..?
- बाळाला अधिक प्रमाणात दूध किंवा आहार दिल्यामुळे,
- दुधाची ऍलर्जी असल्यास,
- पोटातील इन्फेक्शनमुळे,
- बाळास न आवडणारे पदार्थ भरवल्याने,
- तसेच गॅस रिफ्लेक्समुळेही बाळ उलटी करु शकते.
अशा कारणांमुळे बाळाला उलटी होऊ शकते.
बाळास होणारी उलटी धोकादायक आहे की नाही ते असे ओळखा :
बाळास दूध पाजल्यावर लगेच होणारी उलटी ही धोकादायक नसते. मात्र जर बाळास जोरजोरात व वारंवार उलट्या होत असल्यास तर त्या धोकादायक असतात. अशावेळी बाळाला वारंवार उलटी झाल्याने डिहायड्रेशन होण्याचा धोका अधिक असतो.
बाळास उलटी होत असेल तर अशी घ्यावी काळजी :
स्तनपान करणाऱ्या नवजात बाळास उलटी होत असल्यास बाळास थोड्याथोड्या वेळाने स्तनपान देत राहावे. यामुळे बाळाला डिहायड्रेशन होणार नाही. स्तनपान केल्यानंतर बाळाची ढेकर काढावी यामुळे पिलेले दूध उलटी होऊन पडत नाही. बाळाची ढेकर काशी काढावी ते जाणून घ्या..
जर आपल्या बाळाचे वय सहा महिन्यांपेक्षा कमी असेल तर व ते फार्मूला दूध पित असल्यास त्याला प्रत्येक 15-20 मिनिटांनी ओआरएस द्रावण द्यावे. यामुळे डिहायड्रेशन होणार नाही.
जर बाळाचे वय सहा महिन्यांपेक्षा अधिक असेल व ते स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध आणि पूरक आहार खात असल्यास बाळाला पातळ आहार आणि ओआरएस किंवा साधे पाणी असे तरल पदार्थ द्यावेत.
लहान बाळाच्या उलटीवरील औषध –
बाळाला उलटी होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर कोणतेही औषध देणे टाळा.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते..?
- बाळास वारंवार जोरजोरात उलटी होत असल्यास,
- उलटी बरोबर जुलाब होत असल्यास,
- बाळास हिरवट रंगाची उलटी होत असल्यास,
- उलटीतून रक्त पडत असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते.
हे सुध्दा वाचा..
Read Marathi language article about Vomiting in babies causes and treatments. Last Medically Reviewed on February 16, 2024 By Dr. Satish Upalkar.