बाळाचे वजन वाढवणे –
Baby weight gain food in Marathi :

आपल्या बाळाचे वजन कमी असल्यास पालकांना थोडी चिंता वाटू लागते. विशेषतः जर बाळ व्यवस्थित खात नसेल किंवा बाळाचे वजन व उंची योग्यप्रकारे वाढत नसल्यास बाळाची काळजी वाटणे स्वाभाविक असते. येथे लहान बाळाचे वजन प्रत्येक महिन्याला कसे वाढवावे याविषयी माहिती दिली आहे. योग्य आहार देण्यावर विशेष लक्ष देऊन बाळाचे वजन सुधारले जाऊन बाळ गुटगुटीत होऊ शकते. 

प्रत्येक महिन्यात बाळाचे वजन असे वाढले पाहिजे :

प्रत्येक बाळाची प्रकृती वेगवेगळी असते. जन्मापासून 24 व्या आठवड्यापर्यंत, बाळाचे वजन दररोज सरासरी 5 ग्रॅम वाढते. तर 33 व्या आठवड्यापर्यंत किंवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या बाळांमध्ये वजन वाढण्याची प्रक्रिया 20 ते 30 ग्रॅम पर्यंत असू शकते. अशाप्रकारे वाढत्या वयाबरोबर योग्य पोषकतत्वे असणारा आहार बाळास मिळणे आवश्यक असते.

वयाप्रमाणे बाळाचे वजन कमी असल्यास बाळाची शारीरिक प्रतिकारशक्ती सामान्यपेक्षा खूपच कमकुवत होते. रोग प्रतिकारशक्तीच्या कामतरतेमुळे अशी बालके सहजपणे अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकतात. अशी बालके पुन्हापुन्हा आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.

नवजात बाळाचे वजन वाढवण्याचे उपाय :

जर नवजात बाळाचे वजन कमी असल्यास त्यासाठी आईचे दूध हा एकमेव पर्याय आहे. कारण, आईच्या दुधात सर्व पोषक आणि खनिज असतात, जे बाळाच्या अधिक चांगल्या विकासासाठी आवश्यक असतात. यासाठी प्रत्येक दोन-दोन तासांनी आपल्या नवजात बाळास स्तनपान द्यावे. 

वेळेपूर्वी जन्मलेले असल्यास काहीवेळा अशी बालके आईचे दूध पिण्यास असमर्थ असू शकतात. अशावेळी आपण स्तनपंप मशीनद्वारे आपले दूध काढून ते चमच्याने आपल्या बाळास पाजावे. तसेच काही कारणांमुळे नवजात बाळांना आईचे दूध मिळत नाही. अशावेळी, डॉक्टर आपल्या बाळासाठी योग्य ते फॉर्म्युला दूध देण्यास सांगू शकतात. त्यांच्या सल्ल्याने ते आपल्या बाळास पाजावे. वरील दोन्ही स्थितींमध्ये बाळास दर दोन तासांनी पंपाने काढलेले दूध किंवा तयार केलेले फॉर्म्युला दूध दिले पाहिजे.

बाळास दूध दिल्यानंतर बाळाचे पोट भरले आहे याची खात्री करुन घ्यावी. यासाठी बाळाच्या आतड्यात हालचालींकडे लक्ष द्यावे. जर नवजात बाळ दिवसातून 6 वेळा शी आणि लघवी करत असल्यास, याचा अर्थ असा होतो की बाळाचे पोट भरत असून त्याला दुधातून आवश्यक ते पोषण मिळत आहेत.

सहा ते बारा महिन्यांच्या बाळांचे असे वाढवावे वजन :

जन्मानंतर सहा महिन्यांनंतर, बाळांना अनेक आवश्यक पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असते. त्यामुळे सहा महिन्यानंतर केवळ दुधावर बाळाचे पोषण होऊ शकत नाही. अशावेळी बाळास थोडा पातळ आहार, डाळी, भाज्या, फळे दिली पाहिजेत. बाळाच्या आहारात दूध व दुधाचे पदार्थ म्हणजे लोणी, तूप, दही यांचा समावेश करावा. कारण यामध्ये प्रोटिन्स, कॅल्शियमचे मुबलक प्रमाण असते. याशिवाय विविध फळांचा गर, नाचणीची खीर असे पदार्थ बाळाला भरवावे. यामुळे बाळाची वाढ योग्यरित्या होण्यास मदत होते.


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...