नवजात बाळाला पाहिले सहा महिने आईचे दूध दिले पाहिजे. काही कारणास्तव बाळास आईचे दूध देता येणे शक्य नसल्यास योग्य ते फॉर्म्युला दूध बाळासाठी दिले जाते. बाळाला भूक लागेल तसे त्याला दूध पाजणे आवश्यक असते.
बाळांच्या आहाराच्या बाबतीत असा प्रश्न राहतो की, आपण जे बाळास दूध पाजत आहोत ते त्याला पुरेसे पडते की नाही किंवा बाळाचे पोट भरले आहे की नाही हे कसे समजावे? कारण लहान बालके पोट भरल्याचे तोंडाने काही सांगणार नाहीत. यासाठी येथे बाळास दूध पाजल्यावर बाळाचे पोट भरले आहे की नाही ते कसे ओळखावे याविषयी माहिती येथे दिली आहे.
बाळाचे पोट भरले आहे ते असे ओळखा :
जर बाळ स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध पीत असल्यास आणि बाळ दिवसातून पाच ते सहा वेळा शी व लघवी करत असल्यास, याचा अर्थ असा होतो की बाळाचे पोट भरत असून त्याला दुधातून आवश्यक ते पोषण मिळत आहेत.
तसेच दर महिन्याला बाळाचं वजन कमीतकमी अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅमने वाढत असेल तर आईचं दूध किंवा फॉर्म्युला दूध बाळाला पुरेसं आहे हे समजावे. बाळाला पुरेशी लघवी होणे तसेच बाळाचे व्यवस्थित वजन वाढणे या दोन गोष्टीवरून बाळाचे पोट भरत आहे हे समजण्यास मदत होते.
बाळास एकाचवेळी भरपूर प्रमाणात दूध पाजण्यापेक्षा दिवसातून सहा ते सात वेळा थोडे थोडे दूध पाजावे. त्यामुळे पिलेल्या दुधाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
How do i know my baby is full when breastfeeding in Marathi information.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.