लहान बाळाला ताप आल्यावर हे करा घरगुती उपाय – Baby fever treatment in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

लहान बाळाला ताप येणे :

बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्याने त्याला वरचेवर ताप, सर्दी, खोकला असे त्रास होत असतात. जेंव्हा शरीराचे तापमान हे 100 डिग्री फारेनहाइटपेक्षा अधिक असते तेंव्हा ताप येत असतो.

सामान्यतः वातावरणातील बदल, इन्फेक्शन, लसीकरण, सर्दी खोकला किंवा जुलाबमुळेही बाळांना ताप येऊ शकतो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

बाळास ताप आल्यास अशी घ्यावी काळजी :

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तापावरील कोणतीही औषधे मेडिकलमधून आणून बाळास घालू नयेत. बाळाला तापाचा अधिक त्रास होत असल्यास त्याला आपल्या डॉक्टरांकडे घेऊन जावे.

तापामुळे बाळामध्ये डिहायड्रेशन होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. यासाठी 6 महिन्यापेक्षा कमी वयाचे बाळ असल्यास त्याला वरचेवर स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. 6 महिन्यापेक्षा अधिक वयाचे बाळ असल्यास त्याला वरचेवर तरल पदार्थ, दूध, ओआरएस मिश्रण द्यावे.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

बाळाच्या तापावर हे करा उपाय :

• बाळाला ताप असल्यास घाबरून जाऊ नका.
• बाळाच्या अंगावरील सर्व कपडे काढा.
• खिडक्या बंद ठेवू नका. घरात पुरेशी खेळती हवा असावी.
• ताप उतरण्यासाठी ओल्या टॉवेलने अंग पुसून काढा.
• पॅरासिटामोल सिरप ( उदा. क्रोसिन, कॅलपोल इ) योग्य डोसनुसार देऊ शकता.
या उपायांनी ताप तात्पुरता उतरतो. मात्र हे उपाय करूनही ताप येत राहिल्यास डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जावे.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.