बाळाला जुलाब अतिसार होत असल्यास हे करा उपाय – Baby Diarrhea treatment in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

बाळाला जुलाब होणे :

अनेक कारणांमुळे बाळाला पातळ जुलाब होत असते. प्रामुख्याने इन्फेक्शनमुळे असा त्रास बाळाला होत असतो. बाळाला पातळ जुलाब होत असल्यास डिहायड्रेशन होऊन धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी बाळाला जुलाब अतिसार होत असल्यास डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.

बाळाला पातळ जुलाब होत हे करा उपाय :

जुलाबामुळे बाळास सतत पातळ संडासला होत राहिल्यास डिहायड्रेशन होण्याचा अधिक धोका असतो. डिहायड्रेशनमुळे शरीरातील क्षार व पाणी कमी होत असते. यासाठी जुलाबमध्ये डिहायड्रेशन होऊ नये म्हणून तरल द्रव्यपदार्थ बाळास देणे व आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जुलाबवरील कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाळास देऊ नये.

सहा महिन्यापेक्षा कमी वयाच्या बाळास जुलाब होत असल्यास त्याला वरचेवर स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. यामुळे त्याच्यामध्ये डिहायड्रेशन होत नाही. जुलाब व उलट्या यांचा त्रास अधिक होत असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

जर महिन्यापेक्षा अधिक वयाचे बाळ असल्यास त्याला जुलाब अतिसार होत असल्यास लहान बाळाला वरचेवर तरल पदार्थ, दूध, ओआरएस मिश्रण द्यावे. यामुळे बाळाच्या शरीरात जुलाबामुळे डिहायड्रेशन होणार नाही.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

WHO ORS चे पाकीट घरी नसल्यास घरगुती मीठ, साखर व पाणी याद्वारे घरीच हे आपण बनवू शकतो.
यासाठी 1 ग्लास पाणी + 1 चमचा साखर + चिमटी मीठ हे मिश्रण आपण एका भांड्यात करून ठेवावे व थोडया थोडया वेळाने चमच्याने हे द्रावण बाळास पाजावे. शहाळाचे पाणीही देऊ शकता. तसेच त्यांना हलका आहारही खाण्यास द्यावा. जुलाब व उलट्या यांचा त्रास अधिक होत असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे.

Diarrhea in Babies information in Marathi.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.