लहान बाळाचा खोकला :

छोट्या बाळांना वरचेवर सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असतो. नवजात बाळांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्याने असे आजार वरचेवर होत असतात.

बाळाला खोकला लागल्यास अशी घ्यावी काळजी :

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खोकल्यावरील कोणतीही औषधे मेडिकलमधून आणून बाळास घालू नयेत. बाळास खोकल्याचा त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जावे.

बाळाच्या खोकल्यावरील घरगुती उपाय :

जर बाळाचे वय एक वर्षापेक्षा जास्त असल्यास खोकल्यावर काही सुरक्षित घरगुती उपाय करू शकता.
यासाठी मध व तुळशीच्या पानांचा रस यांचे बाळास चाटण करू शकता.

मात्र सहा महिन्यापेक्षा बाळाचे वय कमी असल्यास कोणतेही घरगुती उपाय करू नयेत. सरळ डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जावे.

Cough in babies causes and treatment in Marathi.


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...