लहान बाळाचे पोट दुखणे :
लहान बाळांना होणारे त्रास समजणे हे अवघड असते. कारण मोठ्यांप्रमाणे कुठे दुखते ते काही लहान बाळ सांगू शकत नाहीत. यासाठी बाळाला पोटात दुखत आहे ते कसे समजावे व त्यावरील उपाय यांची माहिती येथे दिली आहे.
बाळाच्या पोटात दुखत असल्यास अशी काही लक्षणे असतात :
- बाळ दूध पिण्यास टाळाटाळ करते.
- बाळ आपला हात पोटाच्या ठिकाणी लावत राहते.
- बाळाच्या पोटाला हात लावल्यास त्याला
- अधिक त्रास झालेला जाणवतो.
- बाळ सारखे रडू लागते.
बाळाच्या पोटदुखीवरील उपचार :
इन्फेक्शनमुळे प्रामुख्याने बाळाला पोटदुखी होत असते. अशावेळी आपले डॉक्टर योग्य ते एंटीबायोटिक्स औषधे देतील. याशिवाय पोटदुखीवरील औषधेही देतील.
डॉक्टरांकडे कधी जावे..?
बाळ सारखे रडत असल्यास, खात पित नसल्यास बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे. याशिवाय बाळाला ताप येणे, उलट्या होणे, जुलाब अतिसार, शी मधून रक्त पडणे असे त्रास जाणवत असल्यासही बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.
हे सुध्दा वाचा..
Read Marathi language article about Baby Colic pain. Last Medically Reviewed on February 16, 2024 By Dr. Satish Upalkar.