लहान बाळाच्या उचकीवर हे करा घरगुती उपाय – Baby hiccups treatment in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

बाळाला उचकी लागणे :

एक वर्षाच्या आतील बाळांना वरचेवर उचकी येऊ शकते. ही एक सामान्य बाब असते. त्यामुळे बाळास उचक्या येत आहेत म्हणून फार काही चिंता करण्याचे कारण नसते.

दूध पिल्यानंतर बाळाला उचकी येऊ शकते. तसेच उचकी आल्यामुळे पिलेले दूधही थोड्या प्रमाणात बाहेर येऊ शकते. हे प्रामुख्याने रिफ्लक्स मुळे होत असते. अशावेळीही फारशी काळजी करण्याची गरज नसते.

बाळाची उचकी थांबवण्यासाठी हे करा उपाय :

• बाळाला उभ्या स्थितीतचं स्तनपान करावे.
• बाळाला स्तनपान केल्यानंतर 20 मिनिटे उभ्या स्थितीत राहील याची काळजी घ्यावी.
• दूध पाजल्यावर बाळाची ढेकर जरूर काढावी.
• एकाचवेळी भरपूर दूध पाजण्यापेक्षा बाळाला वरचेवर थोडे थोडे दूध पाजत राहावे.
अशी काळजी घेतल्यास बाळाला उचकी लागण्यापासून थांबवता येते.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.