मद्यपानाचे व्यसन हे आज अत्यंत गंभीर अशी समस्या बनली आहे. जगामधील 5 ते 10% लोकसंख्या ही मद्यपानाच्या आहारी गेली आहे. तर भारतातील 20 ते 30% लोकसंख्या ही मद्यपानाच्या विळाख्यात आलेली आहे. बहुतांश तरुणपिढी मद्यपानाच्या जाळ्यात अडकली आहे. गतीशील जीवनशैलीमुळे पालकांचे मुलांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने किशोरवयीन मुलांमध्येसुद्धा मद्यपान व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. जी व्यक्ती 15 वर्षापेक्षा कमी वयापासूनच दारु पिण्यास सुरवात करते त्यांना मद्यपानाचे व्यसन जडण्याची शक्यता सर्वात जास्त असते.
जगभरात मद्यपानाचे व्यसन पुरुष आणि स्त्री यादोहोंमध्येही आढळते. आपल्या संस्कृतीमुळे मद्यपानापासून स्त्रीया काही प्रमाणात दुर आहेत. मद्यपानाचे व्यसन स्त्रीयांसाठी अत्यंत घातक असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. मद्यपान करणाऱया स्त्रियांचा मृत्युदर अधिक आढळतो.
गर्भावस्था आणि मद्यपान परिणाम –
गर्भावस्थेत मातेद्वारा मद्यपान केल्यास तिच्या बालकामध्ये Alcoholic syndrome विकसित होण्याची शक्यता अधिक असते. तसेच अशा बालकामध्ये मानसिक मंदत्व येण्याचा धोका असतो. तर गर्भीणीमध्ये आकस्मिक गर्भपाताचा धोका निर्माण होतो.
दारूचे शरीरावर होणारे दुष्परिणाम –
मद्यपान व्यसनाचा घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. मद्यपानामुळे यकृताचे विविध विकार उत्पन्न होतात. यामध्ये हिपाटायटिस, यकृत संक्रमित होणे, यकृताचा सिरोसिस, लिव्हर फेल्युअर, लिव्हर कैन्सर इ. यकृताचे विकार उत्पन्न होतात. याशिवाय मद्यपान करणाऱयांमध्ये हृद्रोग, हार्ट अटॅक, किडन्या निकामी होणे, फुफ्फुसाचा कर्करोग, पोटाचा कैन्सर तसेच विविध मानसिक विकार होण्याचा धोका अधिक असतो.
दारूचे व्यसनामुळे होणाऱ्या आजारांची माहिती वाचा..
कावीळ (Jaundice)
हिपॅटायटीस (Hepatitis)
लिव्हर सिरोसिस