आव पडणे म्हणजे काय..?
आव पडणे यामध्ये पोटात कळ येऊन जेलीसारखा द्रवपदार्थ संडासवाटे बाहेर पडतो. या त्रासात वारंवार शौचाला लागते. यामध्ये पोटात कळ येऊन शौचाला होते, शौचाला घाण वास येतो, पोट बिघडते तसेच काहीवेळा शौचावाटे रक्तही पडू शकते.
आव पडणे याची कारणे –
दूषित अन्न, दूषित पाणी यातून जंतुसंसर्ग झाल्यामुळे पोट बिघडते व संडास वाटे आव पडत असतो. अमीबियासिस ह्या आजारामुळे देखील आव पडतो. अमिबियासिस हा Entamoeba histolytica या परजीवी च्या संसर्गामुळे होतो. याची लागण सुद्धा दूषित अन्न, दूषित पाणी यातून होते.
संडास मधून आव पडणे याची लक्षणे –
- पोटात कळ येऊन शौचाला होणे,
- पोट दुखणे,
- शौचास वारंवार होणे,
- संडासवाटे जेलीसारखा तेलकट द्रवपदार्थ पडणे,
- शौचाला घाण वास येणे,
- पोटात गुडगुड आवाज होणे,
- कधी कधी रक्त पण संडासात पडणे,
- मळमळ व उलट्या होणे,
- अशक्तपणा जाणवणे,
अशी लक्षणे यामध्ये जाणवू लागतात.
आव पडणे यावर घरगुती उपाय –
उपाय क्रमांक 1 –
आव पडत असल्यास ताकात थोडे हिंग, सुंठ, मिरी, जिरे आणि सैंधव मीठ घालून ते ताक प्यावे.
उपाय क्रमांक 2 –
संडासात आव पडत असल्यास गरम पाण्यात अर्धा चमचा सुंठ मिसळून ते पाणी प्यावे.
उपाय क्रमांक 3 –
संडास मधून आव पडत असल्यास झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम दुधात चमचाभर तूप मिसळून प्यावे.
उपाय क्रमांक 4 –
संडास मध्ये आव पडत असल्यास दहीभात खावा. तसेच मेथी दाण्याचे चूर्ण दह्यात मिसळुन खाल्याने आव पडणे थांबते. हे उपाय संडासात आव पडणे यावर उपयोगी पडतात.
संडास मध्ये आव पडत असल्यास घ्यायची काळजी –
- बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
- उकळवून गार केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे.
- पुरेसे पाणी तसेच शहाळ्याचे पाणी, लिंबूपाणी, ताज्या फळांचा रस असे द्रवपदार्थ प्यावेत.
- आव पडत असल्यास हलका आहार घ्यावा.
- यावेळी मसालेदार, तिखट, पचनास जड असणारे पदार्थ खाणे टाळावे.
- बाहेरून आल्यावर हात, पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.
- जेवण्यापूर्वी आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
- भाज्या व फळे स्वच्छ धुवूनचं खावीत.
आव पडणे यावरील औषध उपचार –
आमांशमुळे आव पडत असल्यास मेट्रोनिडॅझोल यासारखे औषध दिले जाते. यासोबतच अँटिबायोटिक्स औषधे देखील उपचारामध्ये दिले जाऊ शकतात.
हे सुध्दा वाचा – जुलाब वरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Mucus in stool Causes, Symptoms, Treatment and Home remedies. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.