उत्तम आरोग्यासाठी योग्य पद्धतीने आहार बनवणेही गरजेचे असते जेणेकरून त्या आहारातील पोषक घटकांचा आपल्या शरीराला सम्यक उपयोग होईल. पालेभाज्या व फळभाज्यामध्ये भरपूर प्रमाणातं पोषक घटक असतात.
भाज्या शिजवताना हे करा..
- पालेभाज्या, फळभाज्या बाजारातून आणल्यावर पाण्याने स्वच्छ कराव्यात. त्यामुळे त्यावरील धूळ, केर, किटकनाशके निघून जातील.
- पालेभाज्या जास्त बारीक चिरणे टाळावे. जेव्हा पालेभाज्या बारीक चिरल्या जातात तेंव्हा त्यातील पाचकरस (एन्झाइम) जास्त प्रमाणात त्या भाज्यातून निघुन बाहेर येतात आणि त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होतो.
- चिरल्यानंतर भाज्या धुवू नयेत.
- भाज्या पाण्यात घालून बराच वेळ ठेवणे किंवा भाजी चिरल्यानंतर धुणे यामुळे भाज्यांतील उपयुक्त जीवनसत्त्व कमी होते.
- भाज्या जास्त शिजवू नयेत. भाज्या जास्त शिजवल्यामुळे त्यातील जीवनसत्त्व (Vitamins) कमी होतात.
- एकदा केलेला आहार सारखे-सारखे गरम करू नये. तसे केल्याने त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते.
आहारसंबंधीत हे सुद्धा वाचा..
ताज्या आहाराचे महत्व
उन्हाळ्यात आहार कसा असावा?
पावसाळ्यात काय खावे?
हिवाळ्यात कोणते पदार्थ खावेत?
Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.