यकृताचे कार्य –
यकृत हे शरीरातील एक अतिमहत्वाचे असे अवयव आहे. पचनक्रिया, रक्तसंचारण क्रियेमध्ये यकृताची महत्वाची अशी भुमिका असते. खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे त्यानंतर त्याचे रस, रक्तादी धातूत रुपांतर करण्यासाठी यकृताचे महत्वपूर्ण कार्य असते.
याशिवाय शरीरातील अपायकारक विषारी घटकांचे निचरा करण्याचे महत्वपुर्ण कार्य हे यकृतावरच अवलंबुन असते. म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी यकृताचे आरोग्य चांगले असणे आवश्यक असते. कोणत्याही कारणांनी जर यकृतामध्ये बिघाड झाल्यास वरील महत्वाच्या क्रिया सुरळितपणे होण्यास बाधा पोहचते.
यकृत हा असा अवयव आहे की जो अविरतपणे काम करत असतो. आहाराचे पचन झाल्यानंतर त्याचे, सर्व शरीर सुरळीत चालवण्यासाठी मुख्य असणाऱया रक्तात रुपांतर करण्याचे महत्वाचे कार्य यकृतामार्फतच केले जाते. रक्ताशिवाय जीवनाची कल्पनाच करता येणे शक्यच नाही त्यामुळे यकृतासारख्या महत्वपूर्ण अवयवाची काळजी घ्यावी लागते.
यकृताच्या कार्यास बाधा आणणारे घटक –
- प्रामुख्याने यकृत विकारांमुळे यकृताच्या कार्यास अडथळा निर्माण होते. यकृत विकार अनेक प्रकारचे असतात. जसे, यकृताचा आकार वाढणे, यकृताला सुज येणे (हिपॅटायटिस), लिव्हर सिरॉसिस, यकृताचा कैन्सर, कावीळ या सारखे यकृत विकार असतात. याशिवाय पचनसंस्थेचे विकार, पित्ताशयाचे विकार यांमुळेसुद्धा यकृताच्या कार्यावर विपरित परिणाम होतो.
- अयोग्य आहाराच्या सेवनामुळे यकृतामध्ये बिघाड निर्माण होतो. पित्तवर्धक उष्ण, पचण्यास जड, तेलकट, चरबीयुक्त पदार्थ, मसालेदार आहारामुळे यकृताचे आरोग्य बिघडते.
- अति प्रमाणात दारू पाण्यामुळे, तसेच तंबाखू, चुना, सुपारी यांच्या व्यसनामुळे अनेक विषारी घटक शरीरात गेल्याने यकृताचे आरोग्य बिघडते.
- त्याचप्रमाणे रात्री जागरण करणे, मानसिक ताणतणावांमुळेही यकृताचे आरोग्य धोक्यात येते.
लिव्हर ची काळजी कशी घ्यावी..?
- योग्य आहार घ्यावा. पित्तशामक, पचनास हलका आहार घ्यावा.
- तेलकट पदार्थांचे मर्यादितच सेवन करावे. चरबीयुक्त, स्निग्ध पदार्थांच्या अतिसेवनामुळे रक्तातील चरबीचे आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते त्यामुळे फैटी लिव्हर हा यकृत विकार उद्भवतो. यासाठी चरबीयुक्त पदार्थ (फॅट्स) जास्त खाऊ नयेत.
- दारू (मद्यपान), तंबाखू यांमुळे अनेक अपायकारक विषारी घटक यकृत आणि शरीरात जात असतात. त्यामुळे या व्यसनांपासून दूर राहावे.
- रात्री पुरेशी झोप घ्यावी. जागरण करणे टाळावे.
- मानसिक ताणतणाव रहित रहावे.
- नियमित व्यायाम करावा.
यकृतासंबंधित खालील आजारांचीही माहिती वाचा..
Read Marathi language article about Liver health tips.