Dr. Satish Upalkar article about Heart care tips in Marathi. Article contains Diet plan & exercise tips for Healthy Heart.

हृद्याचे आरोग्य कसे जपावे..?

आरोग्याच्या दृष्टिने हृद्याचे कार्य अत्यंत महत्वाचे असते. किंबहूना जीवंत राहण्यासाठी हृद्य महत्वाची भुमिका निभावत असतो. हृद्याची कार्यक्षमता उत्तम असणे हे एक निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. लोकांनी हृद्याच्या बाबतीत जागरुक रहावे यासाठी 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृद्य दिन म्हणून पाळला जातो.

हृद्याचे आरोग्य जपण्यासाठी उपाय –

हृद्याच्या कार्यात बिघाड झाल्यास अनेकविध विकार उत्पन्न होतात. हृद्रोगामुळे अकाली मृत्यु होण्याचा धोका वाढतो. यासाठी प्रत्येकाने हृद्याची काळजी घ्यावी. हृद्रोग होण्यामागच्या कारणांपासून उदा. व्यसनाधिनता, अयोग्य आहार – विहार, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली इत्यादींपासून परावृत्त व्हावे. हृद्याचे आरोग्याच्या दृष्टिने महत्व विचारात घेता, हृद्याची काळजी कशी घ्यावी, हृद्य निरोगी कसे ठेवावे, हृद्यरोग होऊ नये म्हणून काय करावे, कोणता आहार घ्यावा, काय खाऊ नये याची माहिती येथे दिलेली आहे.

हृद्याची काळजी कशी घ्यावी? Heart care tips in Marathi :

हृद्याच्या आरोग्यासाठी योग्य आहार –

हलका, सुपाच्य आहार घ्यावा.योग्य प्रमाणातच आहार सेवन करावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे, कोशिंबीर, बदाम, मणुका, मोड आलेली कडधान्ये, तंतूमय पदार्थ यांचा भरपूर समावेश करावा.

हृद्याच्या आरोग्यासाठी व्यायाम –

नियमित व्यायाम करावा. दररोज किमान तीस मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. विविध योगासणे करावित. प्राणायाम केल्याने शरीरात प्राणसंचार व्यवस्थित होतो. मानसिक ताणतणाव रहित रहावे. राग, क्रोध, शोक, द्वेष, भय यासांरख्या भावनांवर नियंत्रण ठेवावे.

नियमित तपासणीही महत्वाची..

नियमित तज्ञांद्वारा आरोग्याची, हृद्याची तपासणी करुन घ्यावी. विशेषता रक्तातील नातलगांमध्ये जर हृद्यविकार असल्यास किंवा उच्च रक्तदाब, मधुमेह असल्यास विशेष दक्षता घेणे आवश्यक असते. यासाठी नियमितपणे डॉक्टरांकडून रक्तदाब, रक्तातील साखरेचे तपासणी आणि योग्य उपचार करून घ्यावे.

हृद्याच्या आरोग्यासाठी काय खाऊ नये..?

हृद्याच्या आरोग्यासाठी खालील आहार घटकांचे सेवन टाळणे गरजेचे असते. यांमध्ये,

  • सॅच्युरेटेड फॅट्स – उदा. पामतेल, नारियल तेल, तूप, साय, लोणी, प्राणीज चरबी, अंड्यातील पिवळा बलक या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे अधिक प्रमाण असल्याने वरील पदार्थांचे प्रमाणातच सेवन करावे. सॅच्युरेटेड फॅट्सच्या अतिसेवनाने वाईट कोलेस्टेरॉलमध्ये वाढ होते. यांमुळे हृद्यविकार, उच्चरक्तदाब, धमनीकाठिन्यतः, स्थुलता, मधुमेह यासारखे विकार उत्पन्न होतात.
  • ट्रांस फॅट्स किंवा कृत्रिम स्निग्धपदार्थांचे सेवन करु नये. उदा. वनस्पती तूप यासारख्या पदार्थात ट्रांस फॅट्सचे प्रमाण अधिक असते.
  • हवाबंद पाकिटे, शीतपेये, विविध मिठाया, बेकरी पदार्थ यांपासून दूरच रहावे.
  • आहारात साखर, मीठाचे अत्यंत अल्प प्रमाण असावे. दररोज 4gm पेक्षा जास्त मीठ खाऊ नये.
  • आहारातील मीठाचे प्रमाण, बाहेरील खाद्यपदार्थ जसे हवाबंद पाकीटे, बिस्किटे, चिवडा वैगरे यांसारख्या पदार्थांच्या पाकीटावरील मिठाचे प्रमाण पहावे. त्यानुसारच आपल्या आहारातील मिठाचे नियोजन ठेवावे. लक्षात ठेवा 4 ग्रॅम पेक्षा अधिक मिठाचे एका दिवसामध्ये सेवन करणे धोकादायक असते. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृद्यरोग, धमनीकाठिन्यता यासारखे गंभीर विकार होण्याचा धोका वाढतो.
  • हृदयाच्या आरोग्यासाठी तेलकट पदार्थ, आंबट पदार्थ, पचायला जड असणारा आहार यांचे सेवन करु नये.
  • धुम्रपान, मद्यपान, तंबाखूमुळे हृद्यविकाराचा धोका अधिक पटीने वाढतो. यासाठी हृद्याच्या आरोग्यासाठी व्यसनांचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे.
Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुद्धा वाचा..
हार्ट अटॅक म्हणजे काय? त्याची कारणे, हार्ट अटॅकची लक्षणे, निदान आणि उपचार माहिती मराठीत जाणून घ्या.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...