संडासच्या जागी जळजळ होणे –
बऱ्याचदा संडासच्या जागी जळजळ होऊ लागते. याची अनेक कारणे असू शकतात. प्रामुख्याने तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे हा त्रास होत असतो.
संडासच्या जागी जळजळ होण्याची कारणे –
- तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे संडासच्या जागी जळजळ होत असते. अशावेळी शौचानंतर गुदभागी भगभग होऊ लागते.
- तसेच बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर, पोटातील जंत अशा समस्या असल्यास त्यामुळेही संडासच्या जागी जळजळ होऊ शकते.
- गुदभागी इन्फेक्शन किंवा जखम झाल्याने देखील तेथे जळजळ होत असते.
संडासच्या जागी जळजळ होणे यावर उपाय –
- संडासच्या जागेवर जळजळ होत असल्यास केळे खावे.
- संडास जागी जळजळ होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यात चमचाभर साजूक तूप घालून ते पाणी प्यावे.
- पोट साफ होत नसल्यास व त्यामुळे संडासच्या जागी जळजळ होत असल्यास झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून ते पाणी प्यावे.
- गुदभागी इन्फेक्शन किंवा जखम झाल्याने गुदभागी जळजळ होत असल्यास तेथे अँटीबायोटिक क्रीम लावावी.
संडास जागी जळजळ होत असल्यास काय करावे..?
- अशावेळी तिखट, मसालेदार पदार्थ खाणे कमी करावे.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करावा.
- दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
- चहा-कॉफीचे प्रमाण कमी करावे.
- तंबाखू, स्मोकिंग, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहावे.
- पोटात जंत झाले असल्यास डॉक्टरांकडून जंतनाशक गोळी घ्यावी.
अशी काळजी यावेळी घेतली पाहिजे.
हे सुध्दा वाचा – संडासच्या जागी खाज येणे याची कारणे व उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Burning Anus problem causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.