प्रसूतीनंतर वजन कमी करताना..

गरोदरपणात स्वाभाविकपणे वजन वाढत असते. यासाठी येथे प्रसूतीनंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी काय करावे, कोणते उपाय करावेत याची माहिती येथे दिली आहे.

डिलिव्हरीनंतर वजन कमी कधी करावे..?

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी अशा अवस्थेमुळे आपले शरीर थकलेले असते. त्यामुळे बाळंतपणानंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी योग्य आहार घ्यावा लागतो. तसेच आईच्या दुधावरच बाळाचा आहार सुरू असल्याने डिलिव्हरीनंतरही पोषक आहार घेणे गरजेचे असते. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर लगेच वजन कमी करण्यासाठी डायटिंग करणे किंवा कमी आहार घेणे हे अत्यंत चुकीचे आहे.

बाळंतपणानंतर 6 आठवड्यानी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक असते. या तपासणीच्यावेळी आपण आपल्या डॉक्टरांशी वजन कमी कारण्यासंबंधी चर्चा करावी. नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन झाले त्यानुसार आपले डॉक्टर आपणास योग्य आहार आणि व्यायाम याद्वारे वजन कमी करण्याविषयी मार्गदर्शन करतील.

बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी हे आहेत उपाय :

योग्य आहार आणि व्यायाम यांचे नियोजन ठेवून डिलिव्हरी नंतर वजन कमी करावे.

वजन आटोक्यात ठेवणारा आहार घ्या –
प्रसूतीनंतरही योग्य व पोषकघटकांनी युक्त असा आहार घ्यावा. सकाळी ब्रेकफास्ट किंवा नाश्ता जरूर करावा.
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, ओट्स, धान्ये, कडधान्ये यांचा समावेश असावा. यात फायबर्सचे प्रमाण मुबलक असल्याने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

प्रेग्नन्सी पुस्तक डाऊनलोड करा..
'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती दिली आहे. 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

मांसपेशीच्या मजबुतीसाठी व शारीरिक शक्तीसाठी प्रोटिन्सची गरज असते. यासाठी आहारात दूध व दुधाचे पदार्थ, मटण, मांस, अंडी यांचा समावेश असावा.
दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. याशिवाय शहाळ्याचे पाणी, लिंबू पाणीही पिऊ शकता.

वजन वाढवणारे पदार्थ खाणे टाळा –
बाळंतपणात वजन कमी करायचे असल्यास तेलकट पदार्थ, चरबीचे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, चॉकलेट, मिठाई, जास्त गोड पदार्थ सतत खाणे टाळावे. कारण अशा पदार्थमध्ये कॅलरीज भरपूर असतात. त्यामुळे अनावश्यक चरबीचे वजन वाढत असते.

असा व्यायाम करा –
आपल्या डॉक्टरांनी बाळंतपणात सांगितलेला हलका व्यायाम नियमित करावा. तसेच डिलिव्हरीनंतर सहा आठवड्यानी गरोदरपणात वाढलेले वजन कमी करण्यासाठी खालील व्यायाम करू शकता.

• चालण्याचा व्यायाम (वॉकिंग)
• कीगल्स एक्सरसाइज
• स्ट्रेचिंग
• योगासने
• पोट आणि पाटीचे हलके व्यायाम करावेत.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

किती दिवसात वजन कमी होईल..?

ज्या महिला आपल्या बाळास स्तनपान करत असतात त्यांचे वजन लवकर कमी होत असते. बाळंतपणानंतर साधारण सहा ते नऊ महिने इतका कालावधी वजन आटोक्यात येण्यासाठी लागू शकतो. गरोदरपणात जसे वजन हळूहळू वाढत जात असते तसे ते बाळंतपणानंतर हळूहळू कमी कमी होत असते.

वजन वाढलेले आहे म्हणून, एकाएकी कमी करण्यासाठी उपाशी राहणे किंवा अधिक प्रमाणात व्यायाम करणे असले प्रकार करू नयेत. कारण यामुळे नुकसानच होण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन कमी होऊन शरीर पूर्वीप्रमाणे होण्यासाठी थोडा संयम ठेवणे गरजेचे असते.

Marathi Tips for Reduce weight after delivery.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आहे. 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. करा.