प्रेग्नन्सीमध्ये बाळाची वाढ ही आईच्या गर्भाशयात होत असल्याने याकाळात आईचे वजन आणि पोटाचा आकार वाढत असतो. प्रसूतीनंतर हळूहळू वाढलेले वजन आणि पोट आकारात येत असते.

बाळंतपणानंतर पोट कमी करण्यासाठी हे करा उपाय :

योग्य आहार घ्या..-
प्रसूतीनंतरही योग्य व पोषकघटकांनी युक्त असा आहार घ्यावा. सकाळी ब्रेकफास्ट किंवा नाश्ता जरूर करावा.
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, ओट्स, धान्ये, कडधान्ये यांचा समावेश असावा. यात फायबर्सचे प्रमाण मुबलक असल्याने वजन आटोक्यात राहण्यास व पोट कमी होण्यास मदत होते.

मांसपेशीच्या मजबुतीसाठी व शारीरिक शक्तीसाठी प्रोटिन्सची गरज असते. यासाठी आहारात दूध व दुधाचे पदार्थ, मटण, मांस, अंडी यांचा समावेश असावा. दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. याशिवाय शहाळ्याचे पाणी, लिंबू पाणीही पिऊ शकता.

चरबी वाढवणारे पदार्थ खाणे टाळा..
बाळंतपणात वाढलेल्या पोटाचा आकार कमी करायचा असल्यास तेलकट पदार्थ, चरबीचे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, चॉकलेट, मिठाई, जास्त गोड पदार्थ सतत खाणे टाळावे. कारण अशा पदार्थमध्ये कॅलरीज भरपूर असतात. त्यामुळे अनावश्यक चरबी वाढत असते.

कंबरपट्टा वापरा..
बळांतपणानंतर वाढलेले पोट आकारात येण्यासाठी कंबरपट्टा वापरून पोट बांधणे उपयुक्त असते. प्रसूतीनंतर काही दिवस कंबरपट्टा बांधण्यामुळे पोटाचे ढिले पडलेले स्नायू मजबूत होऊन पोटाचा आकार पूर्ववत होण्यास मदत होते. याशिवाय पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यासही यामुळे मदत होते. डिलिव्हरीनंतर कंबरपट्टा कसा वापरवा ते जाणून घ्या..

नियमित व्यायाम करा..
आपल्या डॉक्टरांनी बाळंतपणात सांगितलेला हलका व्यायाम नियमित करावा. तसेच डिलिव्हरीनंतर सहा आठवड्यानी गरोदरपणात वाढलेले पोट कमी करण्यासाठी चालण्याचा व्यायाम, कीगल्स एक्सरसाइज, योगासने आणि पोट आणि पाटीचे हलके व्यायाम करू शकता.

डिलीवरी नंतर वाढलेले पोट कमी करण्यासाठी डायटिंग करावे का..?

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी अशा अवस्थेमुळे आपले शरीर थकलेले असते. त्यामुळे बाळंतपणानंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी योग्य आहार घ्यावा लागतो. तसेच आईच्या दुधावरच बाळाचा आहार सुरू असल्याने डिलिव्हरीनंतरही पोषक आहार घेणे गरजेचे असते. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर लगेच पोट कमी करण्यासाठी डायटिंग करणे किंवा कमी आहार घेणे हे अत्यंत चुकीचे आहे.

गरोदरपणात वाढलेले पोट हे नऊ महिन्यात हळूहळू वाढलेले असते. ते काही एकाएकी वाढलेले नसते. त्याचप्रमाणे ते वाढलेले पोट हे काही एकाएकी कमी होत नाही. ते हळूहळू कमी होत जाते. यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि थोडा संयम बाळगण्याची आवश्यकता असते.

Read Marathi language article about Reduce belly after pregnancy. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.